दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सुपरहिट ‘सैराट’ चित्रपटातून नावारूपास आलेली अभिनेत्री रिंकू राजगुरूची क्रेझ आजही कायम आहे. सैराटनंतर रिंकू काही चित्रपटांमध्ये झळकली असली, तरी तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सतत चर्चेत राहते. रिंकू सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून इन्स्टाग्रामद्वारे ती तिच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित अनेक फोटोज व व्हिडिओज तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, रिंकूने असं काही केलं आहे, ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. (Rinku Rajguru Instagram posts deleted)
अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील काही पोस्ट्स डिलिट केल्या असून तिने नेमकं हे का केलं आहे? याचे कारण समोर आले नाही. रिंकूचे इन्स्टाग्रामवर केवळ दोनच पोस्ट दिसत आहे. त्यातील एक पोस्ट नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनाच्या वेळेस शेअर करण्यात आली होती. तर दुसरा रील हा २६ जून २०२२ रोजी पोस्ट करण्यात आला आहे.
हे देखील वाचा – “मसाज करणाऱ्या बाईने मला…”, वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, “माझ्या शरीराबाबत…”

शिवाय, काही तासांपूर्वी तिने एक स्टोरीदेखील शेअर केली होती, ज्यामध्ये ती मांजरीबरोबर मस्ती करताना दिसली आहे. रिंकू इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असून तिचे ७ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहे. असे असताना रिंकूने अचानक हा निर्णय का घेतला, याबाबत मोठा संभ्रम आहे.
हे देखील वाचा – नवऱ्याचे कपडे परिधान करुन घराबाहेर पडली हेमांगी कवी, फोटो पोस्ट करत म्हणाली, “भारीतला शर्ट ढापून…”
रिंकूने ‘सैराट’ व्यतिरिक्त ‘कागर’, ‘झुंड’ अश्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ती लवकरच ‘खिल्लार’ या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकरबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे सगळं केलं का? अशी चर्चादेखील सध्या रंगत आहे. मात्र या सगळ्या चर्चांवर रिंकूने अदयाप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.