गुरूवार, सप्टेंबर 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मसाज करणाऱ्या बाईने मला…”, वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, “माझ्या शरीराबाबत…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 15, 2023 | 2:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vidya Balan talks about Body Shaming

"मसाज करणाऱ्या बाईने मला...", वाढत्या वजनावरुन हिणावल्यानंतर रडू लागली विद्या बालन, म्हणाली, "माझ्या शरीराबाबत..."

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन जितकी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते, तितकीच ती तिच्या लूकिंगसाठी देखील ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी विद्याचा ‘नीयत’ हा चित्रपट आला होता. ज्यात तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा अभिनेत्री स्वतःचे वजन कमी करण्यासाठी अतोनात प्रयत्न करत होती. पण त्यात तिला अपयश असल्यानंतर तिने याचा स्वीकार करत तिच्या शरीराच्या सकारात्मकतेबद्दल सर्वत्र बोलू लागली. मात्र, अभिनेत्रीला तिच्या वजनावरून अनेक टोमणे सहन करावे लागले, तिला जोरदार ट्रॉलिंगचा सामना करावा लागला होता. नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत विद्याने तिला झालेल्या या ट्रॉलिंगबद्दल बोलली आहे. (Vidya Balan talks about Body Shaming)

लाइफस्टाइल कोच ल्यूक कौटिन्हो यांच्या मुलाखतीत विद्या बालनने तिच्या शरीरावरून झालेल्या ट्रॉलिंगबद्दल बोलली व तिच्या शरीरातील नकारात्मकतेवर कसा मात करण्याचा प्रयत्न करते, हे सांगताना नुकतीच घडलेली एक घटनादेखील तिने सांगितली आहे. विद्याला मसाज करणाऱ्या एका व्यक्तीने टोमणे मारले होते. तिच्या या टोमण्याला तिने चांगलेच फटकारले होते.

हे सांगताना विद्या म्हणाली, “मी बॉडी मसाज करत होते, आणि मसाज करणार्‍या त्या व्यक्तीने मला विचारले, तू पुन्हा वजन वाढवलेस का? सर्वात आधी, ही एक अतिशय खाजगी गोष्ट आहे. बॉडी मसाजसाठी मी त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला. मी इथे बसायला आणि माझ्या शरीराला जज करुन घ्यायला गेले नव्हते. मला मसाज करून आराम मिळावा म्हणून मी तिथे गेले होते. तेव्हा मी लगेच त्या मसाज करणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट बजावून सांगितले की, तू माझ्या शरीराबाबत भाष्य करू नकोस, मला हे आवडत नाही. शेवटी माझ्याबद्दल असं काही बोलण्याचा अधिकार त्या बाईला कोणी दिला?”

हे देखील वाचा – “…आणि माझ्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली”, असं का म्हणाला अक्षय कुमार?, शेअर केलेली पोस्ट चर्चेत

या घटनेनंतर ती पती सिद्धार्थ रॉय कपूरला भेटल्यावर रडू लागली. त्या महिलेला हे सांगण्याची काय गरज होती? एवढं क्रूर व्हायची काय गरज होती? मी या मसाजची आतुरतेने वाट पाहत होते, कारण माझा संपूर्ण आठवडा खूप व्यस्त गेला होता. मी थकले होते. पण ते पहिल्या १० मिनिटांतच असे घडले, ज्यामुळे अभिनेत्रीवर त्याचा परिणाम झाला.

View this post on Instagram

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

हे देखील वाचा – “तुझ्याशिवाय हे घर…”, अर्जुन कपूरच्या पाळीव श्वानाचं निधन, भावुक होत म्हणाला, “मी तुझ्याशिवाय…”

दरम्यान, या घटनेनंतर कालांतराने विद्या या नकारात्मकतेपासून स्वतःला वाचवायला शिकली आहे. विद्याने काही काळासाठी तिच्या सोशल मीडिया कमेंट बॉक्स डिसेबल केला होता. याशिवाय जो कोणी अभिनेत्रीला वास्तविक आयुष्यात अपमानित करण्याचा प्रयत्न करत आहे, ती त्याच्यापासून दूर अंतर ठेवत असल्याचे विद्या बालनने सांगितले आहे.

Tags: body shamingbollywood actressvidya balan
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
Next Post
Rinku Rajguru Instagram posts deleted

रिंकू राजगुरूने अचानक डिलिट केल्या सगळ्या इन्स्टाग्राम पोस्ट, यामागचे कारण नेमकं काय ?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.