भोजपुरी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भोजपुरी अभिनेता सुदीप पांडे यांच्या निधनाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने सुदीपचा मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. (sudip pandey passed away)
सुदीप त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त होता. त्याचे जीवन खूप हलाखीचे सुरु होते. अमर उजाला’च्या वृत्तानुसार, सुदीपच्या एका मित्राने तो खूप कठीण टप्प्यातून जात असल्याचे म्हटले आहे. सुदीपची कारकीर्द फारशी चांगली जात नसल्याचेही मित्राने सांगितले. त्याने ‘व्हिक्टर’ हा हिंदी चित्रपट बनवला होता. ज्यात त्याने बरेच पैसे गमावले होते. या कारणांमुळे त्यांचे वैवाहिक जीवन तणावात असल्याचेही म्हटले जात होते.

आणखी वाचा – अमोलच्या आजारपणानंतर मोठं संकट, अप्पी-अर्जुनवर गुंडांचं सावट, कथेमध्ये मोठा ट्विस्ट
बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान अभिनेताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तो उच्च शिक्षित होता. सुदीप पांडे हा गया, बिहारचा रहिवासी असून त्याने सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही तर त्याने अनेक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कामही केले. त्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात भोजपुरी चित्रपटांमधून केली होती.
आणखी वाचा – 16 January Horoscope : गजकेसरी योगामुळे गुरुवारचा दिवस सुखदायक, तुमच्यासाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या…
‘मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट, भोपाळ, मध्य प्रदेश’ येथून त्याने आपले शिक्षण घेतले. सुदीपने अनेक भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त ‘सात वचन सात फेरे’ ही टीव्ही मालिकाही केली होती. त्यानंतर त्याचे काही आगामी चित्रपट येणार होते. याआधीच त्याने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. भोजपुरी मनोरंजन सृष्टीतील उमदा कलाकार गेल्याने अनेकांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.