Saif Ali Khan : सैफ अली खानवर एका चोराने चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसून हल्ला केला. यादरम्यान अभिनेता गंभीर जखमी झाला असल्याचं पाहायला मिळालं. अभिनेत्यावर सहा वार करण्यात आले. त्यानंतर त्याला तात्काळ लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सैफ अली खान अखेर घरी परतला आहे. या हल्ल्याप्रकणात सैफ अली खानची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यात अभिनेत्याने त्याच्या धर्माशी संबंधित वैयक्तिक अनुभवाबद्दल भाष्य केले आहे. या मुलाखतीदरम्यान सैफने सांगितले होते की, मुंबईच्या पॉश जुहू भागात तो फक्त मुस्लिम असल्यामुळे घर विकत घेऊ शकत नाही.
सैफ म्हणाला होता की, “जुहूमध्ये मुस्लिम म्हणून घर विकत घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच नकार मिळेल. आणि असं सांगण्यात येईल की, “आम्ही मुस्लिमांना घर देत नाही”. मुलाखती दरम्यान, सैफला विचारले गेले की, त्याला भारताबाहेर अशा भेदभावाचा सामना करावा लागला आहे का? यासंदर्भात अभिनेत्याने उत्तर दिले, “अमेरिकेत नाही, परंतु मला भारतात या समस्याचा सामना करावा लागला”. नंतर, सैफ यांनी भारतातील धार्मिक तणावांवर चर्चा केली आणि तो म्हणाला, “भारतात धार्मिक तणाव आहे आणि तो सहन करणे ही भारतातील एक गोष्ट आहे. म्हणजे, मानवी धर्म हा काही सोप्पा नाही आणि एक धर्म दुसर्या धर्माशी लढायचे कधीही थांबवणार नाही”.
सैफ अली खानवर एका चोरने हल्ला केला ज्याने त्याच्या घरात प्रवेश केला. या हल्ल्यात, चाकूचा एक तुकडा अभिनेत्याच्या मणक्यात अडकला होता. त्याच वेळी, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली होती आणि सैफच्या पाठीच्या कणापासून अडीच इंचाच्या चाकूचा तुकडा काढला होता. पाच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर सैफ घरी परतला आहे.
त्याच वेळी, जेव्हा सैफ रुग्णालयात डिस्चार्ज घेतल्यानंतर आपल्या घरी पोहोचला आणि तो तंदुरुस्त वाटला, तसेच स्वतःच्या पायावर तो चालत घरी आला, यावर अनेकांनी प्रश्न विचारले. शस्त्रक्रिया केलेला व्यक्ती लगेच बरा होऊन स्वतःच्या पायावर कसा चालू शकतो असा प्रश्न अनेकांना पडला. त्याच वेळी, सैफची बहीण सबा पाटौदी यांनी एक पोस्ट शेअर करत सैफच्या लवकर बरे होण्यावर प्रश्न विचारण्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.