Rakhi Sawant Marriage : राखी सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच काही ना काही शेअर करत असते. अभिनेत्री तिच्या दोन लग्नांमुळे चर्चेत राहिली. पण तिची दोन्ही लग्न न टिकता तुटली. दोन लग्नानंतर आता राखीला तिसरे लग्न करायचे आहे. पण यावेळी तिला भारतात नव्हे तर पाकिस्तानमध्ये लग्न करायचे आहे. काही दिवसांपूर्वीच राखी पाकिस्तानला गेली असल्याचं समोर आलं. इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करत तिने पाकिस्तानला जात असल्याचं म्हटलं. आता पाकिस्तानात जाऊन राखी खरंच लग्न करणार का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. अशातच राखीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या तिसऱ्या लग्नाबाबत भाष्य केलं.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी झालेल्या संभाषणात ती पाकिस्तानमधील लग्नाबद्दल बोलली. राखी म्हणाली, “मला पाकिस्तानकडून बरेच प्रस्ताव येत आहेत म्हणून मी पाकिस्तानला आले आहे. त्यांनी माझ्या शेवटच्या दोन विवाहसोहळ्यात मला किती त्रास दिला हे पाहिले. मी पाकिस्तानमध्ये लग्न करण्याचा नक्कीच विचार करेन”. राखी म्हणाली की, “अनेक पाकिस्तानी आणि भारतीय जोडपे लग्न करुन दुबई येथे स्थायिक झाले आहेत आणि चांगले जीवन जगत आहेत. या प्रकारचे विवाह दोन देशांमधील शांतता आणि सामंजस्य प्रोत्साहित करतात”.
आणखी वाचा – देवोलीना भट्टाचार्जीने दीड महिन्यांनी केलं बाळाचं नामकरण, ठेवलं ‘हे’ खास नाव, नेमका अर्थ काय?
राखी पुढे म्हणाली, “भारतीय आणि पाकिस्तानी एकमेकांशिवाय काहीही करु शकत नाहीत. मला पाकिस्तानी लोक आवडतात आणि तिथेही माझे चाहते आहेत”. राखी यांनी तिच्या कथित प्रियकर डोडी खानबद्दल सांगितले, ती म्हणाली, “तो एक अभिनेता आणि पोलिस अधिकारी आहे”. राखी म्हणाली, “लग्न पाकिस्तानमध्ये होईल. रिसेप्शन भारतात आयोजित केले जाईल आणि आम्ही स्वित्झर्लंड किंवा नेदरलँड्स हनीमूनसाठी जाऊ. त्यानंतर आम्ही दुबईमध्ये स्थायिक होऊ”.
याआधी राखीने रितेश सिंगशी लग्न केले होते. पहिले कित्येक दिवस राखीने रितेशबरोबरचे नाते लपवले होते. मग ती रितेशसह ‘बिग बॉस’मध्ये आली. तथापि, राखी आणि रितेश यांचे हे लग्न पुढे गेले नाही. राखीचे दुसरे लग्न आदिल खान दुर्रानी यांच्यसही झाले. आता हे लग्न तुटले आहे. राखी यांनीही आदिल खान दुर्रानी यांच्यावर अनेक आरोप केले होते आणि त्यांना तुरूंगात पाठविले होते. त्याच वेळी, आदिलने सोमी अलीशीही लग्न केले आहे.