‘दिल दोस्ती दुनियादारी’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्वानंदी टिकेकर. या मालिकेमुळे स्वानंदी चांगलीच प्रसिद्धी झोतात आली. यानंतर तिने काही मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर, एका शोचं सूत्रसंचालन देखील केलं होतं. अभिनेत्री असण्याबरोबरच स्वानंदी खूप छान गाते. अशातच दोन वर्षांपूर्वी स्वानंदीने गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्न केलं. स्वानंदी-आशिष या दोघांचे सूर गाण्यामुळेच जुळले. आशिषने ‘इंडियन आयडॉल १२’मध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली होती. या शोचा तो विजेता ठरला नसला, तरी त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली होती. (Swanandi Tikekar bought new home)
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिने तिने आपल्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. स्वानंदी-आशिष यांनी नुकतंच त्यांचं स्वत:चं नवीन घर घेतलं आहे. स्वानंदीने स्वतःचा आणि आशिषचा नव्या घरातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत ही खुशखबर दिली आहे.
आणखी वाचा – बाळासाहेब ठाकरेंचा नातू ऐश्वर्य ठाकरेचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, अनुराग कश्यपबरोबर चित्रपट करणार, मोठी घोषणा
स्वानंदीने शेयर केलेल्या या फोटोंपैकी पहिल्या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये स्वानंदी व आशिष एकमेकांना शुभेच्छा देतानाचे पाहायला मिळत आहेत. या खास फोटोसह स्वानंदीने कॅप्शनमध्ये घराचा इमोजी पोस्ट केला आहे. तर खाली धन्य, कृतज्ञ, आनंदी तसंच स्वत:च्या नावांचे हॅशटॅगही लिहिले आहेत. स्वानंदीने शेअर केलेल्या या फोटोमधून तिने स्वत:नवीन घर घेतले असल्याचे उघडपणे सांगितलेले नाही. मात्र अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – “माझ्याबद्दल चुकीची माहिती देत…”, बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर भडकली अमृता देशमुख, म्हणाली, “बिनडोक रेवा…”
स्वानंदीने शेअर केलेल्या या खास फोटोला चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. अर्चना निपाणकर, शमिका भिडे, अंकिता वालावलकर, अश्विनी कासार, सखी गोखले, सुकन्या मोने, तसंच स्वानंदीचे वडील उदय टिकेकर यांसारख्या अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, स्वानंदी सध्या मनोरंजन विश्वापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर स्वत:चे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.