गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अभिनेत्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अनेक दावे केले जात होते. अशातच त्याच्यावर हल्ला केलेला हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीला पोलिसांनी रविवारी वांद्रे न्यायालयात हजर केले. त्याचे नाव मोहम्मद शहजाद असं असून त्याला न्यायालयाने दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणाला ‘आंतरराष्ट्रीय षडयंत्र सूचित करत आरोपी बांगलादेशचा आहे असं म्हटलं आहे. (saif ali khan attacker)
परंतु आरोपीच्या वकिलाने पोलिसांचे हे दावे खोटे असल्याचे म्हटले. त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी मुंबई पोलिसांनी आरोपीची मुंबईतील वांद्रे भागातील भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. दरम्यान बांगलादेशातून घुसखोरी झाल्याची चर्चा निराधार असल्याचा दावा आरोपींच्या वकिलाने केला आहे. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आरोपीचे नाव असून तो बांगलादेशातून अवैधरित्या भारतात आला होता आणि गेल्या पाच महिन्यांपासून येथे राहत होता.
पण शेहजादचे वकील संदीप शेखरे यांनी या दाव्यांचे खंडन केले, ‘पोलिसांकडे तो बांगलादेशी असल्याचा कोणताही पुरावा नाही. ते म्हणाले की, ते ६ महिन्यांपूर्वी येथे आले होते, मात्र हे चुकीचे विधान आहे. तो ७ वर्षांहून अधिक काळ येथे राहत आहे. त्यांचे कुटुंबही मुंबईत आहे. हे ४३(अ) चे स्पष्ट उल्लंघन आहे. योग्य तपास झाला नाही. शहजादचे वकील संदीप शेखरे यांनी सांगितले की, पोलिसांनी ‘आंतरराष्ट्रीय षडयंत्राचा’ पैलू सुचवला कारण आरोपी यापूर्वी बांगलादेशात राहिला होता.
यापुढे वकील म्हणाले की, “सैफ अली खानने कधीही कोणतेही विधान केले नाही किंवा कोणाकडेही तक्रार केली नाही, की ज्यामुळे त्याला कोणत्याही राज्य, बांगलादेश किंवा इतर कोणत्याही देशाकडून धोका होता. त्याच्यावर एकही आंतरराष्ट्रीय खटला नाही. तो (आरोपी) बांगलादेशी असल्यामुळे त्यांनी केसचा पैलू बदलला. पूर्वी तो बांगलादेशात होता, पण आता तो अनेक वर्षांपासून इथे राहत आहे. तो ६ महिन्यांपासून येथे राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले, हे खरे नाही”.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १८’चा विजेता ठरला करणवीर मेहरा, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव
यापुढे सरकारी वकिलाने युक्तिवाद केला की, ‘आरोपीला सेलिब्रिटी कोणत्या भागात राहतात हे माहीत होते आणि तिथे सुरक्षा आहे, तरीही तो आत गेला. याचा अर्थ त्याने आधीच योजना आखली होती. त्यामुळे या प्रकरणी त्याला नेमकी कोणी मदत केली?, कोण साथ देत होतं?. याची चौकशी झाली पाहिजे. आरोपीच्या रक्ताचे नमुने घ्यायचे आहेत, हल्ल्याच्या वेळी आरोपीच्या अंगावर रक्त असले पाहिजे, ते कापड जप्त करायचे आहे जेणेकरून यासंबंधी आणखी माहिती पुढे येऊ शकेल.