बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी धर्मासाठी मनोरंजन क्षेत्राला रामराम केला आहे. दंगलगर्ल जायरा वसिम व सना खान या अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे. पण यामध्ये अभिनेत्रींबरोबर अभिनेत्यांचाही समावेश आहे. अजय देवगणचा ‘फूल और काटे’ हा चित्रपट सगळ्यांनाच आठवत असेल. या चित्रपटामध्ये अजय व मधू यांच्या मुख्य भूमिका होत्या. १९९१ साली आलेल्या या चित्रपटाला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. अजयचा हा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने आपल्या अभिनयाला सुरवात केली होती. अजयबरोबरच अभिनेता आरीफ खान यांनी अभिनय विश्वात पदार्पण केले. या चित्रपटात ते खालणायकाच्या भूमिकेत दिसून आले होते. त्यांचे ‘रॉकी’ हे पात्र खूप प्रसिद्ध झाले होते. (phool aur kaante villain)
आरीफ यांनी ‘फूल और काटे’ नंतर ९० च्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुनील शेट्टी, सलमान खान, अक्षय कुमार आशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम करताना दिसले . तसेच ‘मोहरा’, ‘वीरगती’, ‘दिलजले’ या चित्रपटांमध्येही दिसून आले. त्यांनंतर ते २००७ साली ‘अ मायटी हार्ट’ या हॉलिवूड चित्रपटामध्येही दिसून आले होते. यामध्ये ते एका टॅक्सी ड्रायव्हरच्या भूमिकेत दिसून आले होते. यामध्ये अँजेलिना जोलीची मुख्य भूमिका होती.
मात्र इतक्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करूनही त्यांना सिनेसृष्टीमध्ये हवं तसं यश मिळू शकले नाही. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय अभिनेत्याने घेतला. त्यांनी स्वतःच्या मुस्लिम धर्मासाठी मनोरंजन सृष्टीला राम राम केला आणि मौलवी बनले.
रॉकी म्हणून समोर आलेले आरीफ आता पूर्णपणे बदललेले दिसून येत आहेत. लांब दाढी, कुर्ता-पायजमा, डोक्यावर टोपी व चश्मा असा लूक सध्या दिसून येतो. अनेकदा ते मुस्लिम धर्माबाबत खूप गोष्टी सांगताना तसेच पालन करताना दिसतात. याव्यतिरिक्त त्याची टुर अँड ट्रॅव्हल्स कंपनी असून असून बंगळुरू येथे स्थायिक झालेले दिसून येतात. सोशल मीडियावरदेखील त्यांचे ७९ हजार फॉलोअर्स आहेत. त्यांचे अनेक फोटो व व्हिडिओदेखील व्हायरल होताना दिसतात.