‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात अंकिता वालावलकर आणि धनंजय पोवार यांची मैत्री चांगलीच गाजली होती. हे दोघं एकमेकांना बहीण-भाऊ मानतात. ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला असला तरी हे दोघे कायमच एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोघे एमकेकांना अधूनमधून भेटतातही आणि या भेटीचे अनेक खास क्षण ते आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. आता लवकरच अंकिता कुणालसह लग्नबंधनात अडकणार आहे. यामुळे तिची जोरदार लगीनघाई सुरु झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपल्या बहीणीच्या लग्नाच्या तयारीसाठी डीपी दादांनीही कंबर कसली आहे. अंकिता व कुणाल यांच्या लग्नाच्या तयारीसाठी डीपी दादा थेट कोकणात पोहोचले आहेत. (Dhananjay Powar reached in kokan)
अंकिताचे सध्या लगीनघाई सुरु आहे आणि या तयारीचे काही खास क्षण ती आपल्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत आहे. अशातच तिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर धनंजय यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे आणि यावर “भाऊ आलाय मदतीला” असं म्हटलं आहे. यामुळे तिच्या लग्नाची डीपी दादांनीही तितकीच उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. तर हीच स्टोरी पुन्हा रि-शेअर करत डीपी दादांनीही तिला “तू बोलणार आणि मी येणार नाही असं होणार आहे का?” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – सैफ अली खानचा आरोपी अटकेत, तो ‘बांग्लादेशी’ असल्याचा पोलिसांचा दावा, आता पुढे काय?
काही दिवसांपूर्वी अंकिता साड्यांच्या खरेदीसाठी दुकानात गेली असताना डीपी दादाही तिच्याबरोबर गेले होते आणि यावेळी त्यांनी थेट दुकानातून एक मजेशीर रिल व्हिडीओ पोस्ट केला होता. “कपडे खरेदी करायला ११ वाजल्यापासून रात्री ११ वाजले तरी आम्हाला सोडत नव्हती” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये अंकिता कपड्यांच्या दुकानात शॉपिंग करताना दिसली होती तर तिच्या खरेदीला धनंजय वैतागून खाली बसलेला दिसला. अशातच आता त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आणखी वाचा – ‘बिग बॉस १८’चा विजेता ठरला करणवीर मेहरा, ट्रॉफीसह मिळवली इतकी रक्कम, कौतुकाचा वर्षाव
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अंकिता व कुणाल यांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. यासाठी अंकिता जोरदार तयारी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. आणि या तयारीसाठी तिला डीपी दादाही मदत करत आहेत. त्यामुळे आता अंकिता व कुणाल यांच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दोघे कधी विवाहबंधनात अडकणार? याची सर्वजण वाट पाहत आहेत.