शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

हल्ला होताच रक्तबंबाळ झाला होता सैफ अली खान, लेक इब्राहिमने घाबरत रुग्णालयामध्ये नेलं अन्…

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 16, 2025 | 4:11 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saif Ali Khan attack son Ibrahim hospitalized video viral on social media

सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर मुलगा इब्राहिमने रुग्णालयामध्ये नेलं, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घरात घुसून सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला आहे. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याची बातमी समोर येताच बॉलिवडून विश्वात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सैफची मुलं ज्या खोलीत झोपलेली त्यात खोलीत चोर उडी मारुन आला होता. चोराची चाहूल सैफला जाग आली आणि तो बाहेर आला. त्यामुळे आपण पकडले जाऊ या भीतीने चोराने सैफवर हातात असलेल्या धारदार शस्त्राने वार केले. (son Ibrahim hospitalized to saif ali khan)

सैफ अली खान चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला होता आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, सैफचा मुलगा इब्राहिम अली खान याच्या लक्षात आले की त्याची एकही गाडी ताबडतोब हॉस्पिटलला जाण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत त्यांनी वेळ न घालवण्याचा निर्णय घेतला आणि सैफला ऑटोरिक्षात बसवून लीलावती रुग्णालयात नेले. तुम्हाला सांगतो की, सैफच्या घरापासून लीलावती हॉस्पिटल फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आणखी वाचा – Video : ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने घेतली नवीन महागडी कार, किंमत आहे तब्बल ‘इतके’ कोटी, म्हणाली, “खूप खूप आनंदी…”

अशातच करीना कपूरचा काल (बुधवार) रात्रीचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतरचा आहे. ज्यामध्ये करीना काही लोकांशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करिनाच्या मागे एक ऑटो रिक्षा दिसत आहे. या ऑटोरिक्षातून इब्राहिमने सैफला हॉस्पिटलमध्ये नेले असावे, अशी शक्यता आहे. सैफ अली खानवर तातडीनं शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती आहे. मात्र, तो अजून शुद्धीवर आला नसल्याची माहिती आहे. सैफ अली खान शुद्धीवर आल्यानंतर पोलीस त्याचा जबाब घेतील. 

आणखी वाचा – Saif Ali Khan Attacked : “शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून आता…”, सैफ अली खानच्या तब्येतीबाबत कुटुंबियांकडून मोठी माहिती, म्हणाले, “धोका टळला…”

धारदार शस्त्रानं सैफ अली खानवर सहावेळा वार करण्यात आला. त्यापैकी दोन वार त्याच्या शरीरावर लागल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती आहे. सैफ अली खानवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई क्राइम ब्रँचची टीम सैफ अली खानच्या घरी पोहोचली. फॉरेन्सिक टीम या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलिसांनी सैफच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांची चौकशी केली आहे

Tags: saif ali khanSaif Ali Khan Attackson Ibrahim hospitalized to saif ali khan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
ranbir kapoor meet saif ali khan

Video : सैफ अली खानवरचा धोका टळला, रणबीर कपूर-आलिया भट्ट रुग्णालयात भेटीला, व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.