बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या खूप चर्चेत आहे. रात्री उशिरा त्याच्या राहत्या घरी एका अनोळखी व्यक्तीने प्रवेश केला. त्याचवेळी त्या व्यक्तीने सैफवर चाकूवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला असून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सकाळी त्याच्यावर अडीच तासांची शस्त्रक्रिया पार पडली आहे. आता त्याची तब्येत ठीक असून याबद्दलची माहिती सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. त्याला भेटण्यासाठी अनेक कलाकर रुग्णालयात पोहोचले आहेत. (ranbir kapoor meet saif ali khan)
सैफला रुग्णालयात करीना कपूर, इब्राहिम अली खान, सारा अली खान, निर्माते सिद्धार्थ आनंद, शाहरुख खान हे त्याची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले. अशातच आता अभिनेता व करीना कपूरचा भाऊ रणबीर कपूर सैफला भेटण्यासाठी पोहोचले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता कारमधून येताना दिसत आहे. मात्र त्याच्याबरोबर त्याची पत्नी व अभिनेत्री आलिया भट्ट मात्र दिसून आली नाही. रणबीर व सैफ हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांमधील बॉंडदेखील खूप चांगला असलेलादेखील अनेकदा बघायला मिळतो.
दरम्यान आता सोशल मीडियावर सैफच्या हल्ल्यानंतर अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. इतकी सुरक्षा असतानादेखील हल्लेखोर घरात कसा घुसला? असे प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत. अनेक राजकारण्यांनीदेखील या हल्ल्याबाबत निषेध नोंदवला आहे. सैफच्या टीमनेदेखील त्याच्या प्रकृतीविषयी कल्पना दिली आहे. टीमकडूनही अधिकृत भाष्य समोर आले आहे. सैफच्या हल्ल्यासंदर्भात टीमने असं म्हटलं आहे की, “सैफ अली खानवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून तो धोक्याबाहेर आहे. सध्या तो बरा झाला असून डॉक्टर त्याच्या तब्येतीकडे लक्ष ठेवून आहेत”.
पुढे टीमने लिहिले की, “कुटुंबातील सर्व सदस्य सुखरुप आहेत आणि पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आम्ही डॉ. निरज उत्तमानी, डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन आणि लीलावती रुग्णालयातील सर्व टीमचे आभार मानू इच्छितो. तसंच सर्व चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे त्यांनी केलेल्या प्रार्थनांबद्दल आभार”.