शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“डाएट वगैरे भारतात ठेऊन…”, नेपाळमध्ये खाण्यात मग्न झाले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, फोटोही केले शेअर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 13, 2024 | 4:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha vaishampayan and prathamesh laghate nepal diaries

"डाएट वगैरे भारतात ठेऊन...", नेपाळमध्ये खाण्यात मग्न झाले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, फोटोही केले शेअर

सोशल मिडियावर चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन व गायक प्रथमेश लघाटे. मुग्धा व प्रथमेश हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मिडियावर ही जोडी विशेष सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते दोघेही सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच लग्नानंतर मुग्धा व प्रथमेश परदेशात फिरायला गेले असल्याचं समोर आलं आहे. (Mugdha vaishampayan and prathamesh laghate nepal diaries)

मुग्धा व प्रथमेश यांनी नोव्हेंबर महिन्यात लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अगदी शाही थाटामाटात मुग्धा व प्रथमेश यांनी लग्नसोहळा उरकला. लग्नानंतर दोघांनी लगेचच कामाला सुरुवात केली. गाण्यांचे कार्यक्रम करताना ही जोडी दिसली. काहीवेळा ही जोडी कामानिमित्त एकत्र दौरे करतानाही दिसली. मुग्धा व प्रथमेश यांचे देशभरात चाहते आहेत. त्यामुळे बरेचदा महाराष्ट्राबाहेरील चाहत्यांसाठी ही जोडी दौरे करताना दिसली.

आणखी वाचा – “आता तुम्हाला हिंदूही नकोत का?”, सरकारच्या ‘त्या’ निर्णयावर केतकी चितळे भडकली, कॅमेरासमोरच रडू लागली अन्…

दोघांनी त्यांच्या कामातून वेळात वेळ काढत नेपाळ येथे फिरायला गेले आहेत. रोजच्या गायनाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत मुग्धा व प्रथमेश यांनी नेपाळ गाठलं आहे. नेपाळमध्ये भटकंती करतानाचे फोटो प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केले आहेत. अशातच मुग्धाच्या एका स्टोरीवरील फोटोने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या फोटोमध्ये दोघेही नेपाळमधील काठमांडू येथील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नेपाळ, काठमांडू येथील स्पेशल खाद्यपदार्थ दिसत आहेत. या नेपाळच्या खाद्यपदार्थांवर त्यांनी खास ताव मारला आहे.

आणखी वाचा – Video : वैभव मांगलेंच्या लेकाला इंग्रजी शब्द उच्चारताही येईना, स्वतःच शेअर केला व्हिडीओ, वाचन ऐकून तुम्हीही म्हणाल…

“आत्म्यासाठी अन्न, डाएट वगैरे सगळं भारतातच ठेवून इकडे आलो”, असं कॅप्शन देत डाएट विसरुन ही जोडी नेपाळच्या खाद्यसंस्कृतीवर भाळली आहे. याशिवाय नेपाळ येथे जंगल सफर करताना ही जोडी दिसली आहे. शिवाय पशुपतीनाथ इथे मुग्धा-प्रथमेश यांनी देवदर्शनही केले आहे. मुग्धा-प्रथमेश यांनी नेपाळमधील मनाकमना, पोखरा फेवा लेक, फिश्तैल, गुप्तेश्वैर महादेव केव्ह अशा ठिकाणी भ्रमंती केली असून याची खास झलक त्यांने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

Tags: entertainmentmugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha vaishampayan and prathamesh laghate nepal diariesnepal diary
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
anushka sharma angry look

Video : "वहिनी भडकल्या आणि…" 'त्या' मॅचदरम्यान अनुष्का शर्मा भलतीच भडकली अन्…; व्हिडीओ व्हायरल, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.