नाटक हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्यला आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष काम करताना बघणं ही एक प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. नाटकादरम्यान प्रेक्षकांनाही त्यांचे अडीच ते तीन तास कसे जातात हे त्यांनाही कळत नाही. आयुष्यातल्या सर्व भावना प्रेक्षक त्या दोन ते तीन तासात विसरून नाटकाचा मनमुराद आनंद घेत असतात, असं म्हंटल तरी काही वावगं ठरणार नाही. (Lakshmikant Berde)
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी देखील अनेक नाटकं केली. आजही प्रेक्षकवर्ग लक्ष्मीकांत यांच्या नाटकाच्या प्रेमात आहेत. एका मुलाखतीत लक्ष्मीकांत यांनी चाहत्यांचा एक किस्सा सांगितला होता जो ऐकला की चाहत्यांच्या त्यांच्यावरील प्रेमाची प्रचिती येते. काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या जपलं ते आपलं या भागात.
पाहा लक्ष्मीकांत यांनी सांगितलेला चाहत्याचा किस्सा (Lakshmikant Berde)
मुलाखतीदरम्यान लक्ष्मीकांत चाहत्यासोबतचा किस्सा सांगत म्हणाले होते की, माझा शिवाजी मंदिरला प्रयोग होता, त्यावेळी तिथे प्रयोगानंतर एक माणूस मला भेटायला आला, आणि म्हणाला अडीच तास विसरलो होतो मी घराला. यावर मी सहज विचारल का ? तेव्हा तो म्हणाला घरात मी सोडून सगळे आजारी आहेत. आणि खिशात फक्त पाच रुपये आहेत आणि औषधाला पैसेच नाहीत. औषध आणायला आलो होतो जाताना पाहिलं तर इथे तुमचं नाटक सुरु होणार होत, मोह आवरला नाही आणि अडीच तास विसरलो की घरात कोण आजारी आहेत ते. (Lakshmikant Berde Fan Incident)
हे देखील वाचा – यामुळे सलमान खानने धरला होता लक्ष्मीकांत बेर्डेसोबत अबोला
यापुढे लक्ष्मीकांत म्हणाले की, एवढे असे अंगावर काटे आणणारे प्रसंग बघायला मिळाले आहेत ते पाहून खरंच असं कुठेतरी वाटतंय की, आपण काहीतरी लोकांसाठी करतोय.आणि करत राहावं. याशिवाय बऱ्याच हॉस्पिटलमधून सुद्धा मला बोलावतात की, कँसर रुग्ण आहे शेवटची स्टेज आहे आणि त्याला तुम्हालाच पाहायची इच्छा आहे, अशावेळी मी आवर्जून जातो आणि जायलाच पाहिजे असं मला वाटतं.
