मित्रांनो प्रत्येकाची काही ना काही स्ट्रगल स्टोरी असतेच. स्ट्रगलची ही गोष्टच प्रत्येकाला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहित करते. मराठी चित्रपटसृष्टीतील अशाच एका यशस्वी अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त जाणून घेऊयात काय आहे या अभिनेत्रीची स्ट्रगल स्टोरी. (Struggle Story Saie Tamhankar)
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची, हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आज सईचा वाढदिवस त्या निम्मित जाणून घेऊयात सईच्या आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी. राज्यनाट्य स्पर्धेमधून सईने तिच्या अभिनयाची सुरुवात केली. सुरुवातील अभिनया मध्ये कोणताही रस नसलेल्या सईचा हातखंडा होता तो म्हणजे कब्बडी, रिले सारख्या खेळांमध्ये. पण नाटकांमध्ये मिळालेल्या यशामुळे सईची अभिरुची बदलली आणि सईने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याचा निश्चय केला.
वयाच्या १७ व्या वर्षी गाठली मुंबई..(Struggle Story Saie Tamhankar)
सई मूळची सांगलीची घरातून सईला अभिनय क्षेत्रात जाऊ नकोस असा कोणताही दबाव न्हवता. वयाच्या १७ व्या वर्षी सईने सांगली सोडून आपला मोर्चा मुंबईच्या दिशेने वळवला. सईने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होत कि मुंबईला येणं जेवढं सोप्प वाटत होत तेवढं ते न्हवत. आईने हिम्मत करून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मुंबईला जाण्याची परवानगी दिली पण इथे आल्यावर समजलं कि स्वतःचे मार्ग स्वतः शोधणं एवढं सोप्प नसत. अगदी प्रवासाच्या सोयी पासून ते राहण्याच्या सोयी पर्यंत सगळंच मिळवण्यासाठी इथे धडपड करवी लागते. २००८ मध्ये सुभाष घईयांच्या ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटातून सईने रुपेरी पडद्यावर आपलं आगमन केलं. त्या नंतर आज पर्यंत सई थांबलीच नाही अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मराठी मालिका यांमध्ये सईने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.
अभिनया व्यतिरिक्त या गोष्टींसाठी चर्चेत राहिली सई(Struggle Story Saie Tamhankar)
अभिनय क्षेत्रात काम करणारा कलाकार या ना त्या गोष्टींमुळे नेहमी चर्चेत असतो. कधी बिकिनी वरून, तर कधी लूक्स, तर कधी दौलतराव या साऱ्या गोष्टींमुळे सई नेहमी चर्चेत राहिली आहे. काही दिवसं पासून सायीचं चर्चेत राहण्याचं कारण ठरलंय ते म्हणे विचित्र पोज आणि त्यावर तयार होणारे विनोदी मिम्स. सर्वत्र सईला बोल्ड, बिन्दास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जात.
सई नो एन्ट्री, हंटर, दुनियादारी, क्लासमेट्स, मिमी, अशा अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांमधून काम करून प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली. मराठी चित्रपट सृष्टीतील या बिनधास्त अभिनेत्रीला Itsmajja च्या टीम कडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.