शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, “मला तुझी आई म्हणून…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Sai Lokur shared a special post on social media to wish her daughter on the occasion of completing six months.

सहा महिन्यांची झाली सई लोकूरची लेक, अभिनेत्रीने शेअर केली पोस्ट, म्हणाली, "मला तुझी आई म्हणून..."

‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. या शोमुळे सईला खूपच लोकप्रियता मिळली. या शोनंतर अभिनेत्री कोणत्या मालिका किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली नाही. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर  ती तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. त्याचबरोबर ती तिच्या लहान मुलीबद्दलही अनेक पोस्ट शेअर करत असते.

सईने गेल्या वर्षी १७ डिसेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी मुलीचं बारस केलं. पण लेकीचं नाव सईने जाहीर केलं नव्हतं. १७ जानेवारी २०२४ला अभिनेत्रीने मुलीचं नाव जाहीर करत त्या नावामागचा अर्थदेखील सांगितला. सईच्या मुलीचं नाव ताशी असं आहे. ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होता. काही दिवसांपूर्वी सई लेकीसह परदेशवारीळा गेली. याबद्दल तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.

आणखी वाचा – “तरीही संसार करेन मनापासून आणि…”, लीलाचा एजेसाठी हटके उखाणा, ऐकून कुटुंबियांनाही झाल भलताच आनंद

अशातच आता सईने तिच्या लेकीला सहा महिने पूर्ण झाल्यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सईने “माझ्या मुलीला सहा महिने पूर्ण झाले आहेत” असं सांगत तिने तिच्या मुलीला उद्देशून एक संदेश लिहिला आहे. यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “आई तुझ्यावर खूप प्रेम करते. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि मला तुझे पालनपोषण करण्याचा विशेषाधिकार दिल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी देवाने पाठवलेला देवदूत आहेस. मला तुझी आई म्हणून निवडल्याबद्दल धन्यवाद. तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस. तुझ्या पाठीशी देवाचे आशीर्वाद कायम राहो”.

आणखी वाचा – “मुंबईकरांचं अस्तित्व संपत चाललं आहे आणि…”, अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “गिरणगावात लहानाचा मोठा झालो पण…”

 गेल्यावर्षी १७ डिसेंबर रोजी सईने तिच्या लेकीला जन्म दिला. “आमच्या आयुष्यात एका चिमुकल्या मुलीचं आगमन झालं आहे. सगळ्यांच्या प्रेमासाठी व शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद.” असं म्हणत तिने तिच्या लेकीच्या जन्माची बातमी दिली होती. तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सईने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबर सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Tags: marathi actressmarathi entertainment newssai lokurSai Lokur Daughter Marathi News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
Next Post
Shivani Rangole Home

'तुला शिकवीन…'मधील अक्षराचं असं आहे सासरकडचं घर, सासूबाईंबरोबर मिळून केली घराची सजावट, स्वच्छतेने वेधलं लक्ष, Inside Video समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.