गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मुंबईकरांचं अस्तित्व संपत चाललं आहे आणि…”, अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत, म्हणाला, “गिरणगावात लहानाचा मोठा झालो पण…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 18, 2024 | 3:36 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ankush Chaudhari shared a post for his play 'Tondi Mill Fantasy' on social media

"मुंबईकरांचं अस्तित्व संपत चाललं आहे आणि…", अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत, म्हणाला, "गिरणगावात लहानाचा मोठा झालो पण…"

मराठी मनोरंजन सृष्टीतला ‘स्टाईल आयकॉन’ म्हणून ओळखला जाणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील सध्याच्या काही आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये अंकुश हा अग्रक्रमी आहे. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा मनोरंजनाच्या क्षेत्रातून त्याने प्रेक्षकांचे भरभरुईन मनोरंजन केलं आहे. सध्या तो डान्स रिअॅलिटी शोमधून परीक्षण करत आहे. टीव्हीवरील स्क्रीनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारा हा अभिनेता आता लवकरच एका नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अंकुशने त्याच्या या नाटकाबद्दल सोशल मीडियाद्वारे एक खास पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मुंबईतील लालबाग-परळसारख्या परिसरात अंकुश लहानाचा मोठा झाला. त्यामुळे तो लहानाचा मोठा होत असतानाच त्याने त्याच्या आजूबाजूच्या शहराची बदलती परिस्थितीही फार जवळून पाहिली आहे आणि शहराच्या याच बदलत्या परिस्थितीवर अंकुश एक नवीन नाटक घेऊन येत आहे. याच नाटकाबद्दलची खास पोस्ट अंकुशने शेअर केली आहे.

आणखी वाचा – “तरीही संसार करेन मनापासून आणि…”, लीलाचा एजेसाठी हटके उखाणा, ऐकून कुटुंबियांनाही झाल भलताच आनंद

या पोस्टद्वारे त्याने असं म्हटलं आहे की, “मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्ष मी या मुंबई शहरात राहत आहे. या शहराचा वेग व त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहत आहे. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी झाली. सांगायची गोष्ट ही की, हे शहर बदलत आहे आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच पाणी करून हे शहर उभ केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारु लागलं आहे”.

आणखी वाचा – मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातले नाराज, मामा म्हणाले, “लग्नात वडील येतील पण…”

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच. एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार ‘तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे”. दरम्यान, अंकुशने आजवर ‘दुनियादारी’, ‘दगडी चाळ’, ‘डबलसीट’, ‘ती सध्या काय करतेय’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. सध्या तो स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या डान्स शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Tags: ankush chaudharimarathi actormarathi entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
bollywood intercast marriage

प्रेमात पडल्यानंतर धर्मही पाहिला नाही, द्वेष, त्रासही झाला तरीही…; वैवाहिक आयुष्यामध्ये आता कोणत्या परिस्थितीत आहेत 'हे' कलाकार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.