झी मराठी वाहिनीवरील सध्या सर्वच मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. यापैकीच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. नुकताच मालिकेत एजे व लीला यांच्या लग्नाचा ट्विस्ट पाहायला मिळाला. श्वेताऐवजी एजेचे लग्न हे लीलाबरोबर झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. मालिकेतील हा ट्विस्ट मालिकेच्या चाहत्यांना आवडला असला तरी एजेच्या सूनांना ही गोष्ट काही पटलेली नाही. एजेलादेखील श्वेताऐवजी त्याचे लीलाबरोबर लग्न झालेले पटलेले नाही. याबद्दल एजेने लीलावर राग व्यक्त केला होता. तसेच लीलाने एजेचा विश्वासघात केल्याचेही त्याने म्हटले होते.
त्यानंतर एजेंची आई सरोजिनी जहागीरदार लीलाबरोबर घराबाहेर पडल्या. घरातल्या कुणालाच काहीच न सांगता त्या लीलाबरोबर घराबाहेर पडल्या. त्यामुळे आपल्या आईला परत जहागीरदारांच्या घरात घेऊन येण्यासाठी गेला आहे. मात्र तो आईला घेऊन जायला येताच लीलाचे आई-वडील त्यांना लग्नानंतरच्या रितीभाती पूर्ण करण्याविषयी सांगतात. यावेळी एजेची आईदेखील त्यांना साथ देते. त्यामुळे कंकण सोडवण्यासाठी दोघेही तयार होतात.
आणखी वाचा – मुस्लिम मुलाबरोबर लग्न करण्यावरुन सोनाक्षी सिन्हाच्या घरातले नाराज, मामा म्हणाले, “लग्नात वडील येतील पण…”
एजे हे सगळं करण्यासाठी अजिबातच इच्छुक नाही पण केवळ आईच्या आग्रहाखातर तो हे सगळं करत आहे. यावेळी त्याला लीलाची आई या विधीनंतर उखाणाही घ्यायला सांगते. मात्र ती त्याच्या तयार होत नाही, तेव्हा लीलाची आईच तिच्या कानात एक उखाणा सुचवते. यानंतर लीला उखाणा घेत असं म्हणते की, “मोहित्यांची मुलगी झाली जहागीरदारांची सून, आशीर्वाद मागते दोन्ही हात जोडून, कितीही अडथळे आले तरी संसार करेन मनापासून, एकदिवस नक्की असा येईल, जेव्हा अभिरामचं पान हलणार नाही लीला वाचून”.
तिच्या या उखाण्यानंतर लीला व एजेची आई,बाबा सगळे आनंदाने टाळ्या वाजवतात. दरम्यान, लीला पुन्हा एजेंबरोबर जहागीरदारांच्या घरात जाणार का? एजे लीला बेकलो महून स्वीकारणार का? किंवा एजेमच्या सूना लीला जहागीरदारांच्या घरात सामावून घेणार का? हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.