भारतरत्न सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर ही कुणी बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. पण ती एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमीदेखील नाही. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या अनेक मनमोहक फोटोंना चाहते लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद देत असतात. सोशल मीडियावर ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. अशातच तिच्या एका पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले आहे. साराने तिच्या शिक्षणाबद्दलची एक पोस्ट शेअर करत तिचे मास्टरचे शिक्षण पूर्ण झाल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. (Sara Tendulkar Completed Her Masters)
साराने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. त्यामध्ये तिने वैद्यकीय क्षेत्रातले मास्टरचे शिक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. ‘निकालाचा दिवस’ असं हटके कॅप्शन देत तिने हा फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. सारा ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. तिने तिच्या आईप्रमाणेच वैद्यकीयशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. साराची आई म्हणजेच अंजली तेंडुलकर या बालरोगतज्ञ आहेत. आपल्या आईच्या पाठोपाठ तिनेदेखील या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले आहे. दरम्यान तिच्या या दीक्षांत समारंभासाठी आईवडील अर्थात सचिन-अंजली तेंडुलकर हेदेखील सहभागी झाले होते.

आणखी वाचा – रुबिना दिलैक होणार जुळ्या मुलांची आई, नवऱ्याला ‘ही’ गोष्ट कळताच तो हादरला, अभिनेत्री म्हणाली, “तो माझ्याशी…”
साराने ‘कॉलेज ऑफ लंडन’ मध्ये वैद्यकशास्त्रातून (मेडिसीन) मास्टर्स पूर्ण केलं आहे. नुकताच विद्यापीठाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. तिने ‘क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन’ या कोर्समध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. साराने या कोर्समध्ये ७५ टक्क्यांहून (डिस्टिंक्शन) अधिक गुण मिळवले आहेत. मुंबईमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी लंडन विद्यापीठात प्रवेश घेतला होता. त्यानंतर आता तीने मास्टर्सचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
दरम्यान, सारा ही शुभमन गिलबरोबरच्या नात्यांच्या अफवांमुळे कायमच चर्चेत असते. अनेकदा ते दोघे एकत्रही दिसले आहेत. नुकतंच तिने तिच्या शुभमन गिलबरोबरच्या डीपफेक फोटोबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर यावर कारवाईची मागणीदेखील केली होती. यानंतर ती आता पुन्हा एकदा तिच्या शिक्षणामुळे चर्चेत आली आहे.