मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस मराठी’नंतर ‘या’ लोकप्रिय कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, प्रोमो समोर

Saurabh Moreby Saurabh More
मे 17, 2024 | 11:08 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi fame Vishal Nikam and Jay Dudhane are coming from Star pravah new serial

'बिग बॉस मराठी'नंतर 'या' लोकप्रिय कलाकारांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन, नव्या मालिकेची घोषणा, प्रोमो समोर

स्टार प्रवाह वहिनी अनेक मराठी मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. अशातच प्रेक्षकांच्या आणखी मनोरंजनासाठी स्टार प्रवाह वाहिनीवर आणखी एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पूजा बिरारी आणि विशाल निकम यांची प्रमुख भूमिका असलेली ‘येड लागलं प्रेमाचं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या पहिल्या दोन्ही प्रोमोंना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. आता याच्या तिसऱ्या प्रोमोत प्रेक्षकांना एका नवीन अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे.

येत्या २७ मे पासून रात्री १० वाजता स्टार प्रवाहवर सुरु होणाऱ्या ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोमध्ये राया आणि मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री पूजा बिरारी यांची झलक पहायला मिळाली. त्यानंतर आता लवकरच मालिकेतील आणखी एक महत्त्वाचं पात्र म्हणजेच इन्स्पेक्टर जय घोरपडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि ही भूमिका बिग बॉस मराठी फेम जय दुधाणे हा अभिनेता साकारत आहे.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा – शुक्रवारी मेष व मकरसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्या नशिबात नेमकं काय?, जाणून घ्या…

मालिकेचा हा नवीन प्रोमो सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत जय दुधाणे हा हुशार व कर्तबगार पोलिस अधिकारी दाखवला असला तरी तो तितकाच लाचखाऊ असल्याचं या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय शोमधून एकत्र दिसलेली विशाल व जयची जोडी आता पुन्हा एकदा मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.

आणखी वाचा – चैतन्य-अर्जुनच्या भेटीबद्दल साक्षीला कळलं, मधुभाऊंना महीपतपासून अर्जुन-सायली सुरक्षित ठेवणार का?, दोघेही सहमताने एकत्र राहणार का?

मालिकेच्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांसह मराठी कलाकारांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे. मेघा धाडे, रेश्मा शिंदे यांसह अनेक कलाकारांनी प्रोमोखाली कमेंट्सद्वारे या मालिकेविषयी उत्सुकता दर्शवली आहे. तसेच विशाल-जय यांचे अनेक चाहतेही या जोडीला पुन्हा एकदा टीव्हीवर एकत्र पाहण्यासाठी आतुर असल्याचे कमेंट्सद्वारे म्हटले आहे.     

Tags: bigg boss marathijay dudhanemarathi entertainment newsvishal nikam
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Gharoghari Matichya Chuli Promo

जानकीसमोर येणार ऐश्वर्याचा खोटेपणा, थेट धमकी देत केली कानउघडणी अन्…; अपमान होताच नवा कट आखणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.