रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

RRR चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर केके सेंथिलच्या पत्नीचे धक्कादायक निधन, अवयव निकामी झाले अन्…; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 16, 2024 | 1:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Cinematographer Senthil Wife Death

RRR चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर केके सेंथिलच्या पत्नीचे धक्कादायक निधन, अवयव निकामी झाले अन्...; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमार यांची पत्नी, योग प्रशिक्षक रुही उर्फ ​​रुहिनाझ यांचे गुरुवारी निधन झाले. सिकंदराबादच्या KIMS हॉस्पिटलमध्ये रुही यांचा मृत्यू झाला. आरोग्याबाबत असलेल्या अनेक समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं. एका प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, आयुष्याच्या शेवटच्या दिवसात उपचारादरम्यान अनेक अवयव निकामी झाल्याने रुही यांचा मृत्यू झाला, असल्याचं समोर आलं. (Cinematographer Senthil Wife Death)

सिनेमॅटोग्राफर केके सेंथिल कुमारच्या टीमनेही याबाबतचे अपडेट शेअर केले आहेत. ज्यामध्ये लिहिले आहे की, “सिनेमॅटोग्राफर सेंथिलची पत्नी रुही गरू यांचे (गुरुवारी) दुपारी २ वाजता निधन झाले. (शुक्रवारी) सकाळी ९ वाजता महाप्रस्थानम, ज्युबली हिल्स येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.” या जोडप्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ‘बाहुबली’ सेटवरील रुही व सेंथिलबरोबर प्रभास व अनुष्का शेट्टीचे जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा – वडिलांच्या गुंडगिरीमुळे जॉनी लिवर आत्महत्या करायला गेले अन्…; अनेक वर्षांनी अभिनेत्याचा गौप्यस्फोट, म्हणाले, “वडिलांना कंटाळून…”

View this post on Instagram

A post shared by Senthil Kumar (@dopkksenthilkumar)

योग प्रशिक्षक रुही यांनी अनुष्का, प्रभास व इलियाना डिक्रूझ यांसारख्या अनेक सेलिब्रिटींना योगाचे प्रशिक्षण दिले होते. त्या भरत ठाकूरच्या हैदराबाद विभागातील योग वर्गाच्या प्रमुख होत्या. जून २००९मध्ये लग्नानंतर सेंथिल व रुही यांना मुलगा झाला. रुही यांची काळजी घेण्यासाठी सेंथिलने सिनेसृष्टीतुन व त्याच्या इतर कामांमधून ब्रेक घेतला होता. रुही व सेंथिल दोघांनी प्रेमात पडल्यानंतर लग्न केले. लग्नानंतर रुही हैदराबादला राहायला गेली आणि तिथे तिने स्वतःचा व्यवसाय सुरु केला.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई होताना आनंद अन्…; लंडनमध्ये अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार, ‘त्या’ व्हायरल पोस्टने वेधलं लक्ष

सेंथिल त्याच्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या टीमचा भाग आहे. या जोडीने अनेक प्रोजेक्टवर एकत्र काम केले आहे. त्याच्या सहकार्याचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. राजामौलींच्या कामाच्या भव्यतेचे कौतुक करणाऱ्यांकडून सेंथिलचे सिनेमॅटोग्राफीसाठी नेहमीच कौतुक झाले आहे. त्याने ‘RRR’, ‘मगधीरा’, ‘अरुंधती’, ‘यमडोंगा’, ‘छत्रपती’, ‘ईगा’,’साई’ असे यशस्वी चित्रपट केले. याशिवाय ‘बाहुबली: द बिगिनिंग’ व ‘बाहुबली: द कन्क्लूजन’मध्येही त्यांनी एकत्र काम केले.

Tags: Cinematographer Senthil Wife Deathroohi deathRRR fame kk senthil wife deathsenthil wife death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Udaan serial fame actress Kavita Chaudhary passed away due to heart attack

मालिकांमध्ये काम करणारा चेहरा हरपला, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चाहतेही हळहळले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.