रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नीता अंबानींकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची आलेली ऑफर रोहित शर्माने नाकारली? पुढील हंगामात दुसऱ्या संघामधून खेळणार?, चर्चांना उधाण

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 6, 2024 | 4:28 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
नीता अंबानींकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची आलेली ऑफर रोहित शर्माने नाकारली पुढील हंगामात दुसऱ्या संघामधून खेळणार, चर्चांना उधाण Rohit Sharma Rejected The Captaincy Offer

Rohit Sharma Rejected The Captaincy Offer

सध्या सर्वत्र आयपीयलच वार वाहतंय. या सर्वांमध्ये एक संघ ३ पराभवांचा सामना करून देखील चांगलाच चर्चेत आहे तो संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. तीन सामन्यांमधील पराभवानंतर सर्वत्र कर्णधार हार्दिक पांड्याला ट्रोल केले जाऊ लागले. त्यानंतर आता रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधार पदावर दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्याबाबत एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्माने याबाबत स्पष्टीकरण दिल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या सर्वेसर्वा नीता अंबानी यांनी रोहितला पुन्हा एकदा कर्णधारपदाची ऑफर दिली असल्याचं सांगितलं जातंय. (Rohit Sharma Rejected The Captaincy Offer)

या व्हायरल होणाऱ्या फोटोनुसार रोहित शर्माला पुन्हा कर्णधारपदाची ऑफर देण्यात आल्या नंतर त्याने ती ऑफर नाकारली असून २०२५च्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचा भाग नसणार असल्याच्या देखील चर्चा आहेत. रोहितने कर्णधारपदाची ऑफर नाकारल्या असल्याच्या चर्चा आहेत. या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा मुंबई इंडियन्स या संघाकडून करण्यात आलेली नाही. मात्र हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्स संघाचं कर्णधारपद याबाबत मात्र अजून संभ्रमाची परिस्थती आहे. हार्दिक पांडयाच्या ट्रोलिंगवरून त्याच्या समर्थनार्थ अनेक माझी खेळाडू देखील पुढे आलेले पाहायला मिळाले.

???? Breaking News ????

Yesterday, Rohit Sharma was offered the captaincy of Mumbai Indians, but he rejected it. Also he clearly mentioned that he will not play for MI from next season. [Source: Link in reply]

"Nothing over self-respect." ???? pic.twitter.com/mxUtD4jYvu

— Selfless⁴⁵ (@SelflessCricket) April 4, 2024

आणखी वाचा- सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा आधी घटस्फोट पाच महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न, आता थाटामाटात पार पडला ओटीभरणाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल

रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील कर्णधारपदाची रस्सीखेच आणि मुंबई संघाची कामगिरी याबद्दल नवज्योत यांनी नवीन वक्तव्य केलं आहे. नवज्योत म्हणाले,” भारताचा हिरो, भारताचा कर्णधार आपल्या फ्रेंचायजीचा कर्णधार नाही ही गोष्ट कोणालाही सहन होणारी नाही. रोहित शर्माची नक्की काय चूक आहे?”. तसेच हार्दिक पांड्याची बाजू घेत नवज्योत म्हणाले “हार्दिक पांड्याची तरी यामध्ये काय चूक आहे? जर त्याच्या नेतृत्वाखाली मागचे सामने मुंबई जिंकली असती तर त्याला कोणीही कर्णधार पदाबद्दल प्रश्न विचारले नसते”. वानखेडेवरील सामन्या दरम्यान टॉस प्रसंगी हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीवर चाहत्यांनी दिलेल्या घोषणाविरोधात संजय मांजरेकर यांनी देखील चाहत्यांना नीट वागण्याचा सल्ला दिला. (Rohit Sharma Rejected The Captaincy Offer)

आणखी वाचा- “साताऱ्याचे लोक खूप…”, सध्या साताऱ्यामध्येच राहत असलेल्या प्रसाद जवादेने सांगितलं तिथलं राहणीमान, म्हणाला, “एखाद्याला रस्ता विचारला तर…”

मुंबई इंडियन्सच्या संघात आता सूर्यकुमार यादवची पुन्हा एकदा संघात एन्ट्री झाली झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या गोठात जरा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या येण्याने आगामी सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवता येणार का हे पाहणं रंजक ठरणार आहे.

सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Paru fame Purva Shinde talked on her relationship with Kiran Gaikwad see the details

पूर्वा शिंदे व किरण गायकवाडच्या लग्नाच्या चर्चा, अखेर अभिनेत्रीचं नात्यावर भाष्य, म्हणाली, “गुगलवर सर्च केलं तेव्हा...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.