मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“साताऱ्याचे लोक खूप…”, सध्या साताऱ्यामध्येच राहत असलेल्या प्रसाद जवादेने सांगितलं तिथलं राहणीमान, म्हणाला, “एखाद्याला रस्ता विचारला तर…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 6, 2024 | 1:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paru fame Prasad Jawade talked about Satara see the details

"साताऱ्याचे लोक खूप...", सध्या साताऱ्यामध्येच राहत असलेल्या प्रसाद जवादेने सांगितलं तिथलं राहणीमान, म्हणाला, "एखाद्याला रस्ता विचारला तर..."

‘झी मराठी’ वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पारूचा साधेपणा अनेकांना आवडतोय. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक व प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे शूटिंग हे सध्या सातारामध्ये सुरु आहे. अशातच नुकतंच या मालिकेच्या सेटची खास सफर करण्यासाठी मराठी मीडियाला आमंत्रण देण्यात आले होते.

यावेळी आदित्य किर्लोस्कर म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने इट्स मज्जाबरोवर खास संवाद साधला. यावेळी त्याने शूटिंगनिमित्त सातारामध्ये आहे. त्यामुळे साताराच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी त्याने असं म्हटलं की, “साताराची लोकं खूप चांगली असून इकडची सगळी माणसं खूप मदतनीस आहेत. मी इतर शहराचं नाव घेत नाही. पण तिथे एखाद्याला रस्ता विचारला तर ते सहज सांगत नाहीत. पण साताराच्या लोक याबाबत लगेच मदत करतात आणि हे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे.”

आणखी वाचा – अकलूजला प्रयोग, रिंकू राजगुरु कुटुंबाला घेऊन आली अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितलं अभिनेत्रीने कशी दिली वागणूक, म्हणाला, “माज, नखरे असं…”

यापुढे त्याने असं म्हटलं की, “इथे मला खूप ठिकाणी अप्रतिम जेवायला मिळत आहे. त्यामुळे डाएटकडे माझं दुर्लक्ष होत आहे. पण इथला परिसर खूप छान आहे. इथली हवा थंड व फ्रेश आहे. मुख्यत: रात्रीचे इथे आकाशात तारे दिसतात, जे मुंबई-पुण्यात दिसत नाहीत. तर आम्ही रात्री शूटिंगनंतर सेटवर बसून रात्रीचे चंद्र, तारे बघत असतो आणि त्यामुळे पॅकअपनंतर खूप शांत वाटतं. पण सध्या मी अमृतापासून लांब आहे, त्यामुळे या एका कारणाशिवाय मला सातारा आवडत आहे.”

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, राजकीय मंडळींचीही खास उपस्थिती, म्हणाले “मोठी गुंतवणूक आणि…”

दरम्यान, सध्या मालिकेत पारूच्या लग्नाची घाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर एकीकडे प्रीतम व दिशाच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. पारूसाठी आलेलं स्थळ हे बोगस असतं, त्या मुलाला दिशाने पाठवलेलं असतं, आता दिशाने टाकलेल्या या डावात पारू अडकणार का?, की पारूची यातून सुटका होणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.

Tags: marathi actormarathi entertainment newsprasad jawade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Amala Paul shared special photos of her baby shower

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा आधी घटस्फोट पाच महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न, आता थाटामाटात पार पडला ओटीभरणाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.