छोट्या पडद्यावरील लागिर झालं जी या मालिकेत जयडी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे. या मालिकेनंतर पूर्वा शिंदे ‘युवा डान्सिंग क्वीन’ या कार्यक्रमात झळकली होती. आशातच आता ती नव्याने सुरु झालेल्या पारू या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत तिची नकारात्मक भूमिका असून तिची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अशातच नुकताच पूर्वाने नुकताच इट्स मज्जाबरोबर खास संवाद साधला.
यावेळी तिला “तू स्वतःबद्दल कधी गुगल केलं आहेस का?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत ती असं म्हणाली की, “खरतंर मालिकेच्या सेटवर आणि चित्रीकरणादरम्यान आम्ही राहत असलेल्या फ्लॅटवर नेटवर्कची समस्या आहे. मी अलीकडेच स्वतःबद्दल गुगल केलं. तेव्हा मला पहिलं हेच दिसलं की, पूर्वा शिंदे-किरण गायकवाडचं लग्न व पूर्वा शिंदे-निखिल चव्हाणचं लग्न. नंतर माझ्या रिलबाबत असायचं. आता ‘काटा किर्रर्र’ या माझ्या गाण्याची माहितीही तिथे दिसते”.
यापुढे तिला “सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंट्स, ट्रोलिंग याचा सामना कसा करते?” असंही विचारण्यात आलं. तेव्हा ती म्हणाली, “कधीतरी मी कमेंट्स डिलीट करते. कारण मला खूप वाईट वाटतं. शिवाय बऱ्याचदा मी सकारात्मक विचारही केला. आपण नकारात्मक भूमिका करत आहोत त्यादरम्यान लोक माझ्याबद्दल वाईट बोलत आहेत असा विचार मी करते. म्हणजेच मी काम चांगलं करते. पण मला वाईटही खूप वाटतं”.
दरम्यान, ‘पारू’ या मालिकेतून पूर्वा शिंदे दिशाच्या व्यक्तिरेखेतून नकारात्मक भूमिका साकारत आहे. तिची ही भूमिका नकारात्मक असली तरी तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता मालिकेत येणाऱ्या आगामी भागांची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.