सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा आधी घटस्फोट पाच महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न, आता थाटामाटात पार पडला ओटीभरणाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 6, 2024 | 2:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Amala Paul shared special photos of her baby shower

सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा आधी घटस्फोट पाच महिन्यांपूर्वी केलं दुसरं लग्न, आता थाटामाटात पार पडला ओटीभरणाचा कार्यक्रम, फोटो व्हायरल

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉलने नुकतेच प्रियकर जगत देसाईबरोबर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. अशातच लग्नानंतर अवघ्या दोन महिन्यांतच आमलाने ती गरोदर असल्याची गोड बातमी चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीबद्दलची माहिती दिली आहे. अमलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पती जगतबरोबरचे काही हटके फोटो पोस्ट करून तिच्या गरोदरपणाबद्दल सांगितले आहे.

अशातच नुकताच अभिनेत्रीचा ओटीभरणाचा कार्यक्रम पार पडला. याचे काही खास क्षण अमालाने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अमालाने मेहंदी लावलेली पाहायला मिळत आहे आणि तिने एखाद्या लाल व पांढऱ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर तिचा नवरा जगत देसाईनेदेखील तिच्या कपड्यांना साजेसा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच या फोटोमध्ये पूजा-जगत हे दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amala Paul (@amalapaul)

आणखी वाचा – अकलूजला प्रयोग, रिंकू राजगुरु कुटुंबाला घेऊन आली अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितलं अभिनेत्रीने कशी दिली वागणूक, म्हणाला, “माज, नखरे असं…”

अमला-जगतचे ५ नोव्हेंबर २०२३ रोजी कोचीमध्ये लग्न पार पडले होते. तिच्या लग्नात अमालाने लॅव्हेंडर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. तर जगतनेही अमालाच्या लूकला साजेसा अशी शेरवानी परिधान होती. अमालाचे हे दुसरे लग्न असून तिचा पहिला संसार अवघ्या तीन वर्षातच मोडला होता. अमालाने दिग्दर्शक एल. एल. विजयबरोबर पहिलं लग्न केलं होतं. २०१७ मध्ये अमालाने तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर तिची मैत्री जगतबरोबर झाली. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – “साताऱ्याचे लोक खूप…”, सध्या साताऱ्यामध्येच राहत असलेल्या प्रसाद जवादेने सांगितलं तिथलं राहणीमान, म्हणाला, “एखाद्याला रस्ता विचारला तर…”

अमला पॉल नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आदुजीविथम’ या चित्रपटात दिसली, ज्याचे नाव ‘द गोट लाइफ’ही आहे. अमालाने अजय देवगणच्या ‘भोला’मध्येही छोटीशी भूमिका साकारली होती. दरम्यान, अमालाने शेअर केलेल्या या फोटोखाली अनेक् कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनीही तिला कमेंट्सद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेकांनी तिला अभिनंदनही केले आहे

Tags: amala paulAmala Paul Baby ShowerBollywood entertainment news
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Sanjay Mone got emotional talking about Atul Parchure in zee natya gaurav 2024

Video : मित्रासाठी मंचावरच संजय मोनेंना रडू कोसळलं, उपस्थित कलाकारांच्याही डोळ्यात पाणी, म्हणाले, "४० वर्ष आम्ही एकत्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.