Bigg Boss Marathi Update : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून तुफान राडा सुरु झालेला पाहायला मिळाला. अगदी पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु असलेली पाहायला मिळाली. पहिल्याच आठवड्यात या सिझनचा पहिला कॅप्टन होण्यासाठी सदस्यांमध्ये चढाओढ रंगलेली पाहायला मिळाली. पहिल्याच आठवड्यात शोचे होस्ट आणि प्रेक्षकांचे लाडके अभिनेता रितेश देशमुख सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसणार आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या आगामी भागाचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे,.
या प्रोमोमध्ये रितेश देशमुख थेट अभिनेत्री तन्वी कोलतेवर नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये दिसते की, रितेश देशमुख सर्वप्रथम तन्वी कोलतेची शाळा घेतात. ते तन्वीला उद्देशून म्हणतात, “तन्वी कोलते, तुम्ही किती बोलता? तुम्ही या घराची तंटा क्वीन आहात. तुम्हाला फक्त बोलायचं, भांडायचं आणि ते झालं की रडायचं एवढंच येतं. मला तर असं वाटतं की तुमच्या जिभेचा ब्रेकच फेल झाला आहे.” रितेश यांच्या या थेट आणि स्पष्ट शब्दांमुळे घरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
यावर तन्वी कोलते स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना म्हणते, “रितेश सर, पण एकदा माझं ऐकून घ्या.” मात्र रितेश देशमुख यावर अधिकच कडक भूमिका घेत म्हणतात, “मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही.” या संवादामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, येत्या भागात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या प्रोमोवरून स्पष्ट होत आहे की, पहिल्याच आठवड्यात तन्वी कोलतेला रितेश देशमुखकडून जबरदस्त शाळा घेतली जाणार आहे. सोशल मीडियावर या प्रोमोवर जोरदार चर्चा सुरू असून, काही प्रेक्षक तन्वीच्या वागणुकीवर टीका करत आहेत, तर काहीजण तिच्या समर्थनात उभे राहिले आहेत. आता या वादानंतर तन्वी आपल्या वागण्यात बदल करणार का?, हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.
आणखी वाचा – मासिक पाळीदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं आणि…; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “कपडे बदलण्यासाठी…”




