parvathy thiruvothu on periods : कलाकारांना प्रसिद्धी मिळते पण त्यामागे त्यांची कडी मेहनत असते हे फार कमी जणांना ठाऊक असावं. विशेषतः महिला कलाकारांना अनेक अडचणी पार करत शूटिंग करावं लागतं. बरेचदा या महिला कलाकारांना सेटवरही वाईट अनुभव येतात. काही वेळेस तर त्यांना मासिक पाळीदरम्यानही शूट करावं लागतं. आणि अशावेळी वाटेस येईल त्या शूटचा भाग त्या होतात. असाच एक किस्सा सांगितला आहे एका अभिनेत्रीने. अभिनेत्री पार्वती तिरुवोथुनं हिने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा तिचा अनुभव शेअर केला आहे. ज्यात तिने मासिक पाळीदरम्यानचा शूटिंगचा अनुभव शेअर केला आहे.
‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये, पार्वतीनं खुलासा केला की, तिला मासिक पाळीच्या वेळी शुटिंगदरम्यान धनुषबरोबर रोमान्स करावा लागला. हा अनुभव तिच्यासाठी खूपच त्रासदायक होता. पार्वतीनं सांगितलं की, “मी ‘मर्यन’ नावाचा एक तमिळ चित्रपट केला होता. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी, मला पाण्यात भिजताना अभिनेत्यासह रोमान्स करावा लागला. तो माझ्यावर पाणी ओतत राहिला आणि नंतर मला जाणवलं की, माझ्याकडे कपडे बदलण्यासाठी कपडे नाहीत”.
आणखी वाचा – “सागर कारंडे यांना ‘कॉमेडी करतो तू?”, मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला सुनावलं, म्हणाली, “काय बोलतोय याचं…”
अभिनेत्रीनं पुढे स्पष्ट केलं की, ती नंतर दिग्दर्शकाकडे गेली आणि तिला कपडे बदलण्यासाठी हॉटेलमध्ये जायचं आहे असं सांगितलं, परंतु तिला दिग्दर्शकाने नकार दिला. त्यानंतर, अभिनेत्रीकडे मासिक पाळी आली असल्याचं दिग्दर्शकाला सांगण्याशिवाय पर्याय नव्हता. याशिवाय अभिनेत्रीने तिच्या घरातही मासिक पाळी आल्यावर बाजूला बसावं लागायचं, तिच्या घरात पितृसत्ताक वातावरण होतं असं सांगितलं.
‘मर्यन’ हा एक तमिळ चित्रपट असून यामध्ये धनुष पार्वतीसोबत मुख्य भूमिकेत दिसली. हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. पार्वतीच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर अभिनेत्री ऋतिक रोशनच्या HRX फिल्म्स अंतर्गत बनत असलेल्या प्रोजेक्ट ‘द स्टॉर्म’ मध्ये दिसणार असून या सिनेमाचं दिग्दर्शन अजितपाल सिंग यांनी केलं आहे. पार्वतीनं ‘टेक ऑफ’, ‘उयिरे’, ‘करीब करीब सिंगल’, ‘चार्ली’, ‘मारियन’ आणि ‘बेंगलोर डेज’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.





