vishakha subhedar support sagar karande : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मध्ये अगदी पहिल्या दिवसापासून तुफान राडा सुरु झालेला पाहायला मिळाला. अगदी पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत सुरु असलेली पाहायला मिळाली. पहिल्याच आठवड्यात या सिझनचा पहिला कॅप्टन कोण होणार यासाठी चढाओढ रंगलेली पाहायला मिळाली. आणि या टास्कदरम्यान सागर कारंडे आणि तन्वी कोलते यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. आणि त्यांच्यातील हा वाद चर्चेचा विषय ठरला. या वादात तन्वीने सागरच्या प्रोफेशनवर बोट उचललं आणि कालांतराने सारवासारव केली. तन्वीच हे वागणं घरातील स्पर्धकांना, प्रेक्षकांना आणि सिनेसृष्टीतील इतर कलाकारांना अजिबात आवडलं नाही.
सागर-तन्वीमधील वादावर आता मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत भाष्य करायला सुरुवात केली आहे. सागर कारंडेला सपोर्ट करत आता अभिनेत्री विशाखा सुभेदारने केलेल्या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. विशाखाने फेसबुक पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “सागर कारंडे मस्त खेळतोयस रे. कॉमेडी करतो…? जाम हलक्यात घेतात विनोदी कलाकाराला. कोणीही कालच्या पोरींनी यावं टपली मारुन जावं…! यांनी काय अनुभवलंय?? असं किती काम केलं?”.
आणखी वाचा – “सागर कारंडे यांना ‘कॉमेडी करतो तू?”, मराठी अभिनेत्रीने तन्वी कोलतेला सुनावलं, म्हणाली, “काय बोलतोय याचं…”

पुढे ती म्हणाली, “असो… शब्द पलटवले तीने नंतर. पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात साधारण १०व्या week ला खेळतेय असं कां खेळतेय? लगेचच दुसऱ्यांना तू मला सपोर्ट करणार का वैगरे??? अगं असं काय केलंयस इतरांसाठी की तू त्यांच्याशी डील करत आहेस. आधी “दिल” तर जिंक त्यांचं. ते मला वाटतं तिला शक्य नाही. किरकिर कर्कश आवाज..! शी…”. विशाखाने सागरला पाठिंबा दर्शवित तन्वीला चांगलंच सुनावलं.
आणखी वाचा – मासिक पाळीदरम्यान रोमँटिक फोटोशूट केलं आणि…; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “कपडे बदलण्यासाठी…”
सागर-तन्वीमधील नेमका वाद काय?
सागर आणि अनुश्री बोलत असताना तन्वी येते आणि म्हणते, ‘टास्क थांबवलाय’ त्यावर सागर म्हणतो, ‘तू नको सांगू’. तन्वी म्हणते, ‘मी लक्ष ठेवून आहे तुझ्यावर. कॉमेडी करत जातो तू. तुला वाटतं कॉमेडी करतो म्हणून’ तन्वीनं असं बोलताच सागरचा पारा चढतो. सागरचा राग अनावर होतो आणि तो म्हणतो, ‘कॉमेडी माझं प्रोफेशन आहे’. यावर सारवासारव करत तन्वी म्हणते, ‘प्रोफेशनवर बोलले नाहीये मी. तू कॉमेडी करुन भांडण मिटवतो’. सागरही मोठ्याने, ‘कुणाच्या बापाचं खात नाही’ असं म्हणतो. तरीही तन्वी कॅमेरासमोर मोठ-मोठ्याने ओरडते. सर्व स्पर्धकांना तन्वीचं बोलणं खटकतं. करणसुद्धा सागरची बाजू घेऊन ‘तिनं असं प्रोफेशनबद्दल बोलायला नको’ असं म्हणतो.





