बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“स्वतःला माधुरी दीक्षित समजू नकोस”, हुबेहुब माधुरी दीक्षितसारखी तयार होऊन आली अंकिता लोखंडे, नेटकरी नको नको ते बोलले अन्…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 7, 2024 | 2:43 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ankita lokhande on madhuri dixit look

"स्वतःला माधुरी दीक्षित समजू नकोस", हुबेहुब माधुरी दीक्षितसारखी तयार होऊन आली अंकिता लोखंडे, नेटकरी नको नको ते बोलले अन्…

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमधून अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली. या मालिकेमध्ये तिने ‘अर्चना’ ही व्यक्तीरेखा साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. त्यानंतर ती अनेक कार्यक्रमांमध्येही काम करताना दिसून आली. २०२१ साली ती विकी जैनबरोबर लग्नबंधनात अडकली. दोघेही नुकतेच ‘बिग बॉस १७’ मध्ये दिसून आले होते. यामध्ये दोघांमधील वाद पाहायला मिळाले. पण या कार्यक्रमामध्ये तिला विजेतेपद मिळाले नाही. नुकतीच ती ‘डान्स दिवाने’च्या सेटवर दिसून आली होती. तेव्हा तिच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. (ankita lokhande on madhuri dixit look)

अंकिता नेहमीच चर्चेत असते. नुकतीच ती एका लूकमुळे खूप व्हायरल झाली आहे. अंकिता ‘डान्स दिवाने’च्या सेटवर ऊपस्थित होती. त्यावेळी तिने अभिनेत्री माधुरी दीक्षितसारखा लूक केला होता. ‘सैलाब’ या चित्रपटातील ‘हमको आज कल है’ या आयकॉनिक गाण्यातील माधुरीसारखी वेषभूषा केली होती. तिने पिवळ्या रंगाचा ब्लाऊज व हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. नाकात नथ व सुंदर असे दागिनेदेखील घातले होते. तसेच हेअरस्टाइलदेखील अगदी माधुरीसारखीच होती.

आणखी वाचा – अधिपतीला गाणं शिकवणाऱ्या मास्तरीणबाईने रागाने सोडलं घर, अक्षराचा संशय ठरलं कारण, चारुहासने सूनेलाच दिला दोष, भुवनेश्वरीकडून नवी चाल

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे. नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रियादेखील दिल्या असून एका नेटकऱ्याने लिहिले की, “माधुरी व तू एकदम जुळ्या बहिणी वाटत आहात”. तर काही नेटकऱ्यांनी तिला लूकवरुन ट्रोलदेखील केले आहे. यामध्ये नेटकऱ्याने लिहिले आहे की, स्वतःला माधुरी समजू नकोस”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “ही नेहमी माधुरीची कॉपी करते”.

आणखी वाचा – सात वर्षांनंतर अप्पी-अर्जुन आले एकमेकांसमोर, अमोलला त्याचा बाबा भेटणार का?, प्रोमो पाहून वाढली उत्सुकता

काही दिवसांपूर्वी तिचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटामध्ये ‘यमुनाबाई’ ही भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. तिने या चित्रपटासाठी एकही पैसा घेतला नसल्याचे निर्मात्यांनी सांगितले. तसेच चित्रपटाच्या वेळी या चित्रपटामध्ये अंकिताला कास्ट न करण्याचा निर्णय घेतला होता. याचे कारण सांगताना तिने सांगितले की, रणदीप हुड्डाच्या मते ती या भूमिकेसाठी खूप सुंदर होती.

Tags: ankita lokhandelookmadhuri dixit
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Marathi Actress Renuka Shahane shared a critical post against denying jobs to Marathi people

"मराठी लोकांना घर न देणाऱ्यांना...", मतदान करणाऱ्यावरुन रेणुका शहाणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, "कुठल्याही जाती, धर्म, भाषेच्या विरुद्ध नाही पण..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.