सोमवार, जून 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ शो होस्ट करणार असल्याचे कळताच ‘अशी’ होती जिनिलियाची प्रतिक्रिया, रितेशनेच केला खुलासा, म्हणाला, “तिचं मत…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 29, 2024 | 12:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Riteish Deshmukh talk about Genelia's reaction when he agreed to host Bigg Boss Marathi show

‘बिग बॉस’ शो होस्ट करणार असल्याचे कळताच ‘अशी’ होती जिनिलियाची प्रतिक्रिया, रितेशनेच केला खुलासा, म्हणाला, “तिचं मत...”

‘कलर्स मराठी’वरील येत्या २८ जुलैपासून ‘बिग बॉस’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि चर्चेत असणारा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला ओळखलं जातं. या शोचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार? याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. या शोचे आतापर्यंत दोन प्रोमो जाहीर करण्यात आले असून या शोची तारीखही जाहीर करण्यात आली.

‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळतील. धमाल, मस्ती, गॉसिपसह अनेक गोष्टी या नवीन पर्वात अनुभवायला मिळणार आहेत. परंतु, यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतचे ‘बिग बॉस मराठी’च्या चार पर्वांचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. रितेश देशमुखला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहताच त्याच्या सगळ्या चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रितेशने ‘बिग बॉस’चे होस्टिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जिनिलियाची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल रितेशने सांगितलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

आणखी वाचा – दुसऱ्या नवऱ्याच्या अफेअरबाबत दीपिका कक्करचा खुलासा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझ्या सवतीबरोबर…”

नुकत्याच झालेल्या बिग बॉस मराठीच्या पत्रायकार परिषदेत रितेशला बायकोच्या प्रतिक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने याबद्दल असं म्हटलं की, “त्यांचं (जिनिलियाचं) मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याचं मत हे नेहमीच माझ्या फीवरमध्ये असतं. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही हे त्या कायम सांगतात. त्यांना वाटलं की, ‘बिग बॉस’ हा शो होस्ट करणे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आम्ही ‘बिग बॉस’ हा शो आवडीने बघतो आणि त्यांना माहीत आहे की, मला ‘बिग बॉस’ शो किती आवडतो आणि मी त्याचा किती मोठा फॅन आहे.”

आणखी वाचा – भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन…’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा पहिला प्रोमो आला होता तेव्हा जिनिलियाने रितेशसाठी “Can’t Wait” असं दोन शब्दांचं कॅप्शन दिलं होतं. याशिवाय अभिनेत्रीने हार्ट इमोजीदेखील लावला होता. त्यामुळे नवऱ्याला होस्ट म्हणून पाहिल्यावर जिनिलिया चांगलीच आनंदी झाल्याचं स्पष्ट आहे. येत्या २८ जुलै या तारखेला रात्री ९ वाजता हा शो साऱ्यांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Tags: Bigg Boss Marathi 5 Marathi Newsgenelia deshmukhmarathi entertainment newsriteish deshmukh
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Savitribai Jotirao Phule
Entertainment

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेचा नवा डिजीटल प्रवास, ‘मराठी वारसा’ युट्युब चॅनेलवर पहिला भाग प्रसारित

जून 22, 2026 | 4:13 pm
Ghabadkund Marathi Movie
Entertainment

‘घबाडकुंड’ च्या अभूतपूर्व यशानंतर मराठी युनिव्हर्सचा दुसरा अध्याय, ५० कोटींची भव्य गुंतवणूक

जून 22, 2026 | 4:07 pm
Nikhil Chavan Wedding
Entertainment

करवलीचा नखरा! भावाच्या लग्नात शिवानी बावकरचीच हवा, पाठराखीण म्हणून संभाळतेय जबाबदारी

जून 22, 2026 | 3:09 pm
Sakav marathi web series
Entertainment

बाप-लेकाच्या नात्याला जोडणाऱ्या टिझरची चर्चा, कोकणात शूट झालेली ‘साकव’ वेबसीरिज लवकरच येणार भेटीस

जून 22, 2026 | 1:35 pm
Next Post
Neha Dhupia Statement

"शेवटच्या वेळी कधी भूमिका ऑफर झाली ते…", बॉलिवूडमधील संघर्षाबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं भाष्य, म्हणाली, "काम देणारे लोकही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.