‘कलर्स मराठी’वरील येत्या २८ जुलैपासून ‘बिग बॉस’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि चर्चेत असणारा लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला ओळखलं जातं. या शोचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नवीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार? याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. या शोचे आतापर्यंत दोन प्रोमो जाहीर करण्यात आले असून या शोची तारीखही जाहीर करण्यात आली.
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात प्रेक्षकांना काही खास गोष्टी पाहायला मिळतील. धमाल, मस्ती, गॉसिपसह अनेक गोष्टी या नवीन पर्वात अनुभवायला मिळणार आहेत. परंतु, यंदा शोमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंतचे ‘बिग बॉस मराठी’च्या चार पर्वांचं होस्टिंग दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केलं होतं. मात्र, आता ‘बिग बॉस मराठी’च्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख सांभाळणार आहे. रितेश देशमुखला सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहताच त्याच्या सगळ्या चाहत्यांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. रितेशने ‘बिग बॉस’चे होस्टिंग करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा जिनिलियाची काय प्रतिक्रिया होती? याबद्दल रितेशने सांगितलं आहे.
आणखी वाचा – दुसऱ्या नवऱ्याच्या अफेअरबाबत दीपिका कक्करचा खुलासा, फोटोही केला शेअर, म्हणाली, “माझ्या सवतीबरोबर…”
नुकत्याच झालेल्या बिग बॉस मराठीच्या पत्रायकार परिषदेत रितेशला बायकोच्या प्रतिक्रियेबद्दल विचारण्यात आले तेव्हा त्याने याबद्दल असं म्हटलं की, “त्यांचं (जिनिलियाचं) मत माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याचं मत हे नेहमीच माझ्या फीवरमध्ये असतं. माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही हे त्या कायम सांगतात. त्यांना वाटलं की, ‘बिग बॉस’ हा शो होस्ट करणे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. कारण आम्ही ‘बिग बॉस’ हा शो आवडीने बघतो आणि त्यांना माहीत आहे की, मला ‘बिग बॉस’ शो किती आवडतो आणि मी त्याचा किती मोठा फॅन आहे.”
आणखी वाचा – भुवनेश्वरीची घरातून हकालपट्टी, ‘तुला शिकवीन…’ मालिकेत नवं वळण, कायमची घर सोडणार का?
दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’चा पहिला प्रोमो आला होता तेव्हा जिनिलियाने रितेशसाठी “Can’t Wait” असं दोन शब्दांचं कॅप्शन दिलं होतं. याशिवाय अभिनेत्रीने हार्ट इमोजीदेखील लावला होता. त्यामुळे नवऱ्याला होस्ट म्हणून पाहिल्यावर जिनिलिया चांगलीच आनंदी झाल्याचं स्पष्ट आहे. येत्या २८ जुलै या तारखेला रात्री ९ वाजता हा शो साऱ्यांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे.