Vilasrao Deshmukh Death Anniversary : बॉलिवूडमधील ‘क्युट कपल’ अशी रितेश व जिनिलीया देशमुख यांची ओळख आहे. हे दोघेही सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. रितेश आणि जिनिलीया जितके आपल्या व्यवासायिक आयुष्याबाबत चर्चेत असतात. तितकेच ते आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा चर्चेत असतात. आपल्या प्रत्येक महत्वाच्या क्षणी ते सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. अशातच आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, रितेशचे वडील व जिनिलीयाने आपल्या सासऱ्यांच्या स्मृतीदिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. रितेश व जिनिलीया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात. अशातच आज दिवंगत नेते विलासराव देशमुखांच्या स्मृतीदिनानिमित्त रितेश व जिनिलीया यांनी आदरांजली वाहिली आहे. (Riteish and Genelia misses his father)
रितेश व जिनिलीया यांना दोन मुले आहेत. रियान व राहिल अशी त्यांची नवे आहेत. दोघेही आपल्या मुलांबरोबर धम्माल मस्ती करताना दिसून येतात. मात्र ते आपल्या मुलांमध्ये मराठी सण-संस्कृतीबद्दल अनेक संस्कार रुजवतात. अशातच दोघांनी आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांची दोन्ही मुले आपल्या आजोबांच्या फोटोजवळ हात जोडून त्यांना आदरांजली वाहताना दिसत आहेत. यापैकी जिनिलीयाने विलासराव देशमुखांच्या प्रतिमेजवळचा तिच्या मुलांचा फोटो शेअर करत “आजोबांबरोबरचा वेळ, दररोज, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक सेकंद” असं म्हटलं आहे.
तसंच रितेशनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वडिलांना आदरांजली वाहिली आहे. यामध्ये त्यानेही मुलांबरोबरचा फोटो शेअर करत “माझे कायमस्वरुपीचे सर्वस्व. बाबा तुमची आठवण येत आहे” असं म्हटलं आहे. रितेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्या मुलांच्या मागे विलासरावांचा मोठा पुतळा दिसून येत आहे. तसंच रितेशने वडिलांबरोबरचे त्याचे काही जुने फोटोही शेअर केले आहेत.
दरम्यान, राज्याचे दिवंगत माझी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव देशमुख यांची आज पुण्यतिथी. २०१२ साली विलासराव देशमुख यांचं निधन झालं. रितेश दरवर्षी विलासराव यांच्या स्मृतीदिनी त्यांना आदरांजली अर्पण करत असतो. निरनिराळ्या पद्धतीने तो आपल्या वडिलांच्या आठवणी जागवतो. अशातच त्याने यंदाही काही जुने फोटो शेअर करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.