Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चं पाचव्या पर्वाने अगदी पहिल्या दिवसापासून राडे घालायला सुरुवात केली आहे. स्पर्धकांमधील भांडण, सततचे वाद पाहून आता प्रेक्षक मंडळी ही वैतागली असल्याचं पाहायला मिळत आहे. तरी यंदाच्या पर्वात निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकरचा अरेरावीपणा हा साऱ्यांनाच खटकू लागला. निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांनी पहिल्या दिवसापासून घराततील शांतता भंग करण्याचं काम सुरु केलं. पहिल्याच दिवशी निक्की तांबोळी व वर्षाताई यांच्यात सुरु झालेला वाद आठवड्याच्या शेवटच्या दिवशी संपला. कारण निक्कीची भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने चांगलीच शाळा घेतलेली पाहायला मिळाली.
निक्की तांबोळीचं प्रकरण शांत न होता होता जान्हवी किल्लेकरने अपमानाची भाषा सुरु करत वर्षाताईंचा बराच अपमान केला. पुरस्कारावरूनही तिने उच्चारलेले शब्द पाहून प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला दिसला तर निक्की व जान्हवी या दोन्ही पात्रांवर केवळ प्रेक्षक मंडळीच नव्हे तर कलाकार मंडळींनी ही आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. टास्क नसताना घरात वावरतानाही दोघीजणी प्रचंड हुज्जत घालताना दिसतात. त्यामुळे अनेक कलाकारांनी या दोघींच्या स्वभावाबाबत ‘बिग बॉस’च्या घरातील या दोघींच्या स्वभावाबाबत भाष्य केलेलं पाहायला मिळालं. यापूर्वी मेघा धाडे, सुरेखा कुडची, जय दुधाने, उत्कर्ष शिंदे या कलाकारांनी पोस्ट शेअर करत दोघींवर भाष्य केलं.

यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच अनघा अतुल. अनघा अतुलने आजवर अनेक मालिकांमधून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अनघा सुद्धा ‘बिग बॉस’ची मोठी चाहती आहे. ‘बिग बॉस’ पाहत असताना अनघाला निक्की व जान्हवी यांचं वागणं खटकलं असल्याचं पाहायला मिळतंय. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत तिने असं म्हटलं आहे की, “बिग बॉस मराठी. एक विनंती आहे. एक दिवस वाईल्ड कार्ड एण्ट्री द्या. बाई आणि बुगुबूगुच्या श्रीमुखात लगावयाची आहे”, असं म्हणत चांगलाच पाहुणचार घेतला आहे. अनघा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतून अनघा घराघरात पोहोचली. तर सध्या अनघा मालिका विश्वातून काहीसा ब्रेक घेत हॉटेल व्यवसायात रमली असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात अनघाने स्वतःच हॉटेल सुरु केलं आहे. अनेक कलाकार मंडळींनी या हॉटेलला भेट दिलेली पाहायला मिळाली. आता अनघाच्या म्हणण्यानुसार अनघा खरंच ‘बिग बॉस’मध्ये जाणार का?, अनघाला ‘बिग बॉस’ ही संधी देतील का? हे सारं पाहणं रंजक ठरेल.