Kantara 2 Teaser : सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कंतारा’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि आता अभिनेता चित्रपटाच्या प्रीक्वलसह परतला आहे. ‘कांतारा २’ची प्रदर्शनाची तारीख नाही तर त्याचा टीझरही समोर आला आहे. ‘कांतारा २’ची अधिकृत प्रदर्शित तारीख घोषित केल्यानंतर काही तासांनंतर, ‘कांतारा २’ च्या निर्मात्यांनी त्याचा पहिला टीझर प्रदर्शित केला आहे. ज्यामुळे २०२२ च्या चित्रपटाचा प्रीक्वल आणखी धोकादायक दिसत होता. ‘कांतारा ए लीजेंड चॅप्टर १’ या शीर्षकासह, ८२ सेकंदाचा प्रोमो व्हिडीओ चाहत्यांसाठी थोडा छोटा आहे पण तो छान आहे. तसेच, हे ऋषभ शेट्टीच्या २०२२ च्या चित्रपटाच्या कथेच्या आधीच्या घटनेबाबत सांगणार आहे.
‘वह पल आ गया है। दिव्य जंगल फुसफुसाता है।’ या वाक्याने टीझरची सुरुवात होते. शिवाय काळ्या पडद्यावर काहीतरी जळताना दिसत आहे. पार्श्वभूमीत, अस्पष्ट चित्रात शिवा (ऋषभ शेट्टी) टॉर्च घेऊन जंगलातून चालताना दिसत आहे. त्याला अग्नीने वेढले असताना, एका आवाजाची घोषणा होते. “प्रकाश! प्रकाशात सर्व काही दिसते! पण हा प्रकाश नाही! ती एक दृष्टी आहे! काल काय होतं, काय आहे आणि काय असेल हे दाखवणारी दृष्टी! तुला दिसत नाही का?”, असं टीझरमध्ये बोललं जात आहे.
अंधारात शिवाचा चेहरा समोर येतो. कदंब राजवटीच्या काळात ही कथा घडल्याचेही टीझरमध्ये दिसून आले आहे. गुहेत पौर्णिमा दिसत असताना रक्ताने माखलेला माणूस त्रिशूळ हलवताना दिसतोय. गळ्यात रुद्राक्ष आणि लांब लहरी केसांसह ऋषभ अप्रतिम दिसत आहे. जेव्हा त्याचा चेहरा शेवटी प्रकट होतो, तेव्हा आपल्याला त्याच्या डोळ्यांत चमकणारे अंग दिसतात.
ऋषभ शेट्टी लिखित आणि दिग्दर्शित २०२२ च्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘कांतारा ए लीजेंड चॅप्टर १’ २ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी जयंतीच्या दिवशी पडद्यावर येईल. होंबळे फिल्म्सच्या बॅनरखाली विजय किरगांडूर निर्मित, ‘कांतारा २’ कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. प्रोमो व्हिडीओमध्ये शेअर करताना प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावर लिहिले, “भूतकाळातील प्रतिध्वनींमध्ये पाऊल टाका”.