‘कांतारा’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर त्याचा दुसरा भाग येण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते ‘कांतारा चॅप्टर १’ घेऊन येणार आहे. नकुतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर या चित्रपटाचा फर्स्ट लूक व टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये अभिनेता, दिग्दर्शक ऋषभ शेट्टी अगदी वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. या चित्रपटाचा लूक पाहता प्रेक्षकांची झोप उडवून टाकणारा असा आहे. चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाचा आता येणारा हा भाग उत्सुकता वाढवणार एवढा नक्की असणार आहे. पहिल्या भागातील बऱ्याच गोष्टींचा उलघडा या भागात होणार असल्याचं दिसून येत आहे. (kantara chapter 1 first look and teaser released)
टीझरच्या सुरुवातीला जिथे पहिल्या चित्रपटाचा शेवट झाला होता तशीच सुरुवात होते. चित्रपटातील अभिनेता ऋषभ हातात मशाल घेऊन भयानक घनदाट जंगलात धावताना दिसतो. तेव्हाचा मागे तितकंच खतरनाक म्युझीक ऐकायला मिळतं. तो कोणत्यातरी अदृश्य गोष्टीचा पाठलाग करत असलेला दिसत आहे. पुढे ती अदृश्य गोष्ट गायब होताना दिसते आणि तो अचानाक थांबतो. तो ज्या ठिकाणी थांबतो त्या ठिकाणी तिथे आगीचा वर्तुळात बनलेला दिसतो आणि मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. “प्रकाश! प्रकाशात सर्वकाही दिसतं. पण हा फक्त प्रकाश नाही. ती एक दृष्टी आहे. प्रकाश जो भूतकाळाला व भविष्याला प्रकाशित करतो. ते दृश्यमान आहे का?”, हे शब्द ऐकू आल्यानंतर पुन्हा मोठ्याने ओरडण्याचा आवाज येतो. या आवाजादरम्यान अभिनेता चंद्राकडे वर पाहत राहतो.
या टीझरची सुरुवात अंधाराने होते आणि त्या काळोखात चंद्रकोर आगीच्या स्वरुपात पाहायला मिळते. त्यानंतर एक व्यक्ती पाहायला मिळते. ज्याच्या अंगावर रुद्राक्षांच्या माळा, हातात शस्त्र, दुसऱ्या हातात त्रिशूल, मोठे केस आणि तिक्ष्ण डोळे पाहायला मिळत आहेत. अंगभर रक्ताच्या धारा पाहायला मिळत आहे. तर हा अंदाज अगदी रुद्र स्वरुपात दिसत आहे. हा टीझर पाहता प्रत्येकाच्या अंगावर काटा नक्कीच उभा राहणार आहे. आता ‘कांतारा’चा नवीन भाग कोणत्या नवीन कथेचा उलघडा करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

जेव्हा या चित्रपटाचा पहिला भाग आला होता त्याने जागतिक स्तरावर खळबळ उडवली होती. या चित्रपटाच्या कथेने व कलाकारांच्या अभिनयाने सगळ्यांना बरंच वेड लावलं होतं. आता पुढच्या वर्षी ‘कंतारा चॅप्टर १’चा हिंदीसह कन्नड, तामिळ, तेलुगु, मल्याळम, इंग्रजी तसेच बंगाली अशा ७ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. डिसेंबरच्या अखेरीस या चित्रपटाचं शुटिंग सुरु होणार आहे. चित्रपटातील कलाकार अद्याप समोर आलेले नाहीत. पण चित्रपटाचा फर्स्ट लूकमध्ये अद्भुत कथा पाहायला मिळणार आहे.