बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“‘कभी अलविदा ना केहना’ चित्रपटामुळे बरेच घटस्फोट झाले”, राणी मुखर्जीचं मोठं विधान, म्हणाली, “स्त्रिच्या शारीरिक गरजा…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 27, 2023 | 5:56 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rani Mukharjee International film festival

"'कभी अलविदा ना केहना' चित्रपटामुळे बरेच घटस्फोट झाले", राणी मुखर्जीचं मोठं विधान, म्हणाली, "स्त्रिच्या शारीरिक गरजा…"

भारताच्या ५४व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरु आहे. अनेक दिग्गज कलाकार मंडळी या महोत्सवात सहभाग घेताना दिसत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेदेखील यावेळी हजेरी लावली होती. ‘कभी अलविदा ना केहना’ या चित्रपटाच्या माध्यमातून विवाहबाह्य संबंध व शारीरिक आकर्षण अशा दोन महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. चित्रपटाच्या रिलीजनंतर काय झाले याबद्दल सांगितले. (Rani Mukharjee International film festival)

अभिनेत्री म्हणाली की, “या चित्रपटाने भारतीय विवाहांबद्दलचे सत्य उघड केले आहे, ज्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. मला असं वाटतं की ‘कभी अलविदा ना केहना’सारखा चित्रपट पाहून बऱ्याच जोडप्यांनी घटस्फोट घेतले, कारण हा चित्रपट प्रेक्षकांनी अगदी टोकाचा विचार करूनच पाहिला. करणलाही या चित्रपटाकडून याच प्रतिक्रिया आल्या. या चित्रपटाने बऱ्याच लोकांचे डोळे उघडले. अनेकांनी हा चित्रपट पाहून स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्यायचं ठरवलं”.

आणखी वाचा – थाटात पार पडलं आशिष कुलकर्णी-स्वानंदी टिकेकर यांचं केळवण, कुटुंबियांनी केली जय्यत तयारी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

पुढे राणी म्हणाली, “स्त्रीच्या इच्छा व तिची आवड याबद्दल भाष्य करायलाच हवं. एखादा पती केवळ आपल्या पत्नीला मारहाण करत नाही म्हणजे तो तिला सुखी ठेवत असेल, तिच्या शारीरिक तसेच भावनिक गरजा पूर्ण करत असेल, असा अर्थ अजिबात होत नाही, स्त्रियांचं मत याबाबतीत कधीच ग्राह्य धरलं जात नाही. खरंतर करणने ‘कभी अलविदा ना केहना’सारख्या बोल्ड चित्रपटातून हीच गोष्ट सांगायचं धाडस केलं. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील हा काळाला बराच पुढे नेणारा चित्रपट ठरला” असं म्हणत तिने भारतीय सिनेमाबाबत भाष्य केलं.

आणखी वाचा – “मन दुखावलं आणि तिचा नवरा…”, लेकीच्या घटस्फोटाबाबत नीना गुप्तांचा मोठा खुलासा, म्हणाल्या, “त्यांचं जमलं नाही मात्र…”

या चित्रपटातील तिच्या माया या पात्राबद्दल बोलताना अभिनेत्री म्हणाली, “मायाच्या व्यक्तिरेखेची सुंदर गोष्ट म्हणजे ती ऋषीवर वेगळ्या क्षमतेने वा एक मित्र म्हणून प्रेम करत होती. खरं तर करण जोहरने असा चित्रपट बनवण्याइतपत धाडस त्या वेळी केलं. तेव्हा त्याला काय घडत आहे याची खात्री नव्हती. सशक्त चित्रपट व सशक्त भूमिकांसह उभं राहणं मला नेहमीच महत्त्वाचं वाटतं” असं म्हणत चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत भाष्य केलं.

Tags: 54th international film festivalbollywood actressbollywood movieentertainmentkabhi alvida naa kehnarani mukharjee
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
CM Eknath Shinde On Dharmveer 2

'धर्मवीर २' हिंदीमध्येही प्रदर्शित होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा, म्हणाले, "गुजरात, राजस्थानमध्ये…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.