गुरूवार, मे 22, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अकलूजला प्रयोग, रिंकू राजगुरु कुटुंबाला घेऊन आली अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितलं अभिनेत्रीने कशी दिली वागणूक, म्हणाला, “माज, नखरे असं…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 8, 2024 | 5:12 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rinku Rajguru attended Sankarshan Karhade's play

अकलूजला प्रयोग, रिंकू राजगुरु कुटुंबाला घेऊन आली अन्...; संकर्षण कऱ्हाडेने सांगितलं अभिनेत्रीने कशी दिली वागणूक, म्हणाला, "माज, नखरे असं..."

लेखन, दिग्दर्शन व अभिनय क्षेत्रात अगदी सहज मुशाफिरी करणारा कलकार म्हणजे संकर्षण. मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत काम करत संकर्षण प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या कवितांच्या सादरीकरणातूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. तो एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हेदेखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते.

संकर्षण सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. संकर्षण त्याच्या नाटकानिमित्त होणारे किस्से, आठवणी व काही प्रसंग कायमच सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. अशातच त्याने त्याच्या नाटकाला सैराट फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु गेल्यानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. संकर्षणने रिंकुबरोबरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sankarshan Karhade (@sankarshankarhade)

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, राजकीय मंडळींचीही खास उपस्थिती, म्हणाले “मोठी गुंतवणूक आणि…”

या पोस्टमध्ये संकर्षणने असं म्हटलं आहे की, “काल (५ एप्रिल) अकलूजचा प्रयोग जोरदार झाला. प्रेक्षकांचा खूप अप्रतिम प्रतिसाद मिळाला. पूर्ण शो हाऊसफुल्ल होता आणि या प्रयोगाच्या प्रेक्षकांमध्ये एक खास पाहुणी होती ती म्हणजे रिंकू राजगुरू. मी अकलूजला येतोय म्हणल्यावर स्वतःहून नाटकाला येते म्हणाली, “माझ्या शहरांत तुझं स्वागत आहे. शहरांत काहीही लागलं तरी हक्काने सांग म्हणाली.” आई-बाबांना घेउन आली. प्रयोग पाहून हसली, रडली आणि कौतुक करुन गेली.”

आणखी वाचा – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांची इफ्तार पार्टी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “तिचा ‘सैराट’ आला तेंव्हा ‘आम्ही सारे खवय्ये’मध्ये पाहूणी म्हणून आली आणि आमची ओळख झाली. ती आता चांगले चित्रपट करत आहे. तिची लोकप्रियता तर काय विचारायलाच नको. पण तरीही स्वतःहून कळवून, येऊन, भेटून, विचारपुस करुन, कौतुक करुन गेली आणि विशेष म्हणजे “मी पहिल्यांदा स्क्रीनवर दिसले ती तुझ्यासोबत ‘खवय्ये’मध्ये असं पण म्हणाली. छान वाटलं. ह्या सगळ्या तिच्या वागण्या-बोलण्यात शांतता, स्थिरता, समजूतदारपणा आणि प्रवासाची जाणीव होती. वचवच, माज, नखरे काही नाही.”

यापुढे संकर्षणने “ तुला खूप शुभेच्छा. भेटत राहू आणि हो सग्गळ्यात आनंदी चेहरे झाले ते आमच्या बॅकस्टेज कल्लाकारांचे. त्यांच्या मनात एकच भाव होता. “आरची आली आरची“ असंही म्हटलं आहे. दरम्यान, रिंकुनेही “अगदी खुसखुशीत नाटक, खूप मजा आली” असं म्हणत संकर्षणच्या ‘नियम व अटी लागू’ नाटकाचे कौतुक केले आहे.     

Tags: marathi entertainment newsrinku rajgurusankarshan karhade
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Raja Shivaji Release Date Announced
Entertainment

मोठी घोषणा! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची तारीख समोर, सहा भाषांत होणार प्रदर्शित

मे 21, 2025 | 6:27 pm
Vaishnavi Hagwane Death
Social

पैशांसाठी मारहाण, नणंद तोंडावर थुंकली अन्…; पुण्यातील घरंदाज कुटुंबातील सूनेची आत्महत्या, आई-वडिलांनी सांगितलं नेमकं काय घडलं?

मे 21, 2025 | 5:54 pm
Sunil Shetty on Pahalgam attack
Entertainment

पहलगाम हल्ल्यावर बॉलिवूड शांत का?, सुनील शेट्टी स्पष्टच बोलले, म्हणाले, “बोललं की शिवीगाळ होते आणि…”

मे 21, 2025 | 4:09 pm
Viral Video
Entertainment

Viral Video : भर रस्त्यात नवऱ्याकडून पत्नीला मारहाण, बाळालाही फेकलं अन्…; पालक म्हणून हरले…

मे 21, 2025 | 2:50 pm
Next Post
Paru fame Prasad Jawade talked about Satara see the details

"साताऱ्याचे लोक खूप…", सध्या साताऱ्यामध्येच राहत असलेल्या प्रसाद जवादेने सांगितलं तिथलं राहणीमान, म्हणाला, "एखाद्याला रस्ता विचारला तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.