शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, राजकीय मंडळींचीही खास उपस्थिती, म्हणाले “मोठी गुंतवणूक आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 6, 2024 | 10:58 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tushar and Swati Deval have started their own hotel in Mumbai photo viral on social media

सुप्रसिद्ध मराठी सेलिब्रिटी जोडप्याने सुरु केलं स्वतःचं हॉटेल, राजकीय मंडळींचीही खास उपस्थिती, म्हणाले "मोठी गुंतवणूक आणि..."

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या अभिनयाच्या आवडीबरोबरच उद्योग क्षेत्रातदेखील आपला ठसा उमटवला आहे. मराठी कलाविश्वातील सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, अभिज्ञा भावे, तेजस्विनी पंडित, प्रार्थना बेहरे, यशोमान आपटे, श्रेया बुगडे, प्राजक्ता माळी, हार्दिक जोशीसारख्या अनेक कलाकारांनी स्वत:चा छोटासा का होईना उद्योग सुरु केला आहे. यात आता आणखी एका कलाकार जोडप्याची भर पडली आहे ते म्हणजे तुषार देवल व स्वाती देवल.

‘चला हवा येऊ द्या’ या शोचा संगीत दिग्दर्शक आणि अभिनेत्री स्वाती देवलचा या पती-पत्नींनी तुषार देवल यांनी नुकताच उद्योग क्षेत्रात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी तुषारने स्वातीसह एक मिसळ स्टॉल सुरू केले आहे. या मिसळ स्टॉलचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अशातच आता यांच्या स्टॉलचे हॉटेलमध्ये रूपांतर झाले आहे आणि याच हॉटेलच्या उद्घाटनानिमित्त देवल जोडप्याने ‘इट्स मज्जा’बरोबर खास संवाद साधला. यावेळी त्यांच्या नवीन हॉटेलनिमित्त आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी स्वातीने असं म्हटलं की, “कोणतीही गोष्ट सुरु करण्यासाठी एक प्रेरणा हवी असते किंवा त्याची सुरुवात होणे आवश्य असते. त्याचबरोबर त्यासाठी आयुष्यात काहीतरी वेगळी घटना घडावी लागते. अशातच ‘चला हवा येऊ द्या’ शोने मधल्या काळात ब्रेक घेतला होता. त्यामुळे तुषारला वेळ होता आणि या वेळेत त्याने घरी बसून हॉटेल सुरु करण्याचा विचार सुरु केला. त्याच्या डोक्यात हॉटेल सूर करण्यासाठीच्या नवीन योजना येऊ लागल्या आणि मग त्या दिशेने प्रवास सुरु झाला”

आणखी वाचा – ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या सेटवर मराठी कलाकारांची इफ्तार पार्टी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यापुढे तुषारने असं म्हटलं की, “कलाकार म्हणून तुम्ही कधीच स्वस्थ बसू शकत नाही. आपली नेहमीच काहीना काही धडपड ही चालूच असते. कामानिमित्त आपला स्ट्रगल हा चालूच असतो पणं याकाळात नुसतं घरी बसूनदेखील चैन पडत नाही. त्यामुळे त्या काळात हॉटेल सुरु करण्याचा विचार केला. मग त्यासाठीची धावपळ सुरु केली. मग हॉटेल सुरु करण्यासाठी जाणकरांकडून सूचना व माहिती घेतली. हॉटेल म्हटलं की मोठी गुंतवणूक आली आणि त्यासाठी तुम्हाला त्यासाठी डेडिकेशनही तितकंच लागतं”

आणखी वाचा – अस्तिकाचा नागमणी नेत्राच्या हाती लागणार का?, कुटुंबामध्ये आता कोणाचा होणार मृत्यू?, अद्वैतवरच तिचा जीव जडला अन्…

दरम्यान, मुंबईतील बोरीवलीमध्ये ही ‘देवल मिसळ’ सुरु झाली असून ‘लहान ते ज्येष्ठ…देवल मिसळ सर्वांसाठी बेस्ट…!’ अशी टॅगलाईन त्यांनी आपल्या हॉटेलला दिली आहे. देवल मिसळ यांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, गोपाळ शेट्टी, प्रवीण दरेकर, प्रकाश दरेकर, प्रकाश सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

Tags: marathi entertainment newsswati devaltushar deval
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Rinku Rajguru attended Sankarshan Karhade's play

अकलूजला प्रयोग, रिंकू राजगुरु कुटुंबाला घेऊन आली अन्…; संकर्षण कऱ्हाडेने सांगितलं अभिनेत्रीने कशी दिली वागणूक, म्हणाला, "माज, नखरे असं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.