अभिनेत्री रिंकू राजगुरूने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. सैराट या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या चित्रपटातून रिंकूने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटामुळे रिंकूला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आजवर रिंकूने अनेक चित्रपटांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली आहे. अत्यंत जिद्दीने व मेहनतीने रिंकूने सिनेसृष्टीतील तिचं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयशिवाय रिंकू मोठमोठ्या कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसते. (Rinku Rajguru Post)
अशातच रिंकू एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे. रिंकूने नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. रिंकूने जळगांव येथे महासांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला अभिनेत्रीला प्रमुख पाहुणी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. दरम्यान, रिंकूला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. या गर्दीचा फटका अभिनेत्रीला बसला असल्याचं समोर आलं आहे. रिंकूच्या भेटीसाठी चाहत्यांनी गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं. याचा एक व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या युट्युब चॅनेलवरुन पोस्ट करण्यात आला आहे.

अभिनेत्री कार्यक्रमातून बाहेर येत असताना जमलेल्या घोळक्याने रिंकूला धक्क्काबुक्की करण्यात आली. हे पाहताच अभिनेत्री संतापलेली पाहायला मिळाली. ‘या जागी जर तुमची मुलगी असती तर चाललं असतं का?’, असा थेट सवाल अभिनेत्रीने त्या गर्दीतच चाहत्यांना केला. सध्या रिंकूचा व्हिडीओ चर्चेत आला असून प्रसारमाध्यमांद्वारे अनेक बातम्याही समोर आल्या आहेत. रिंकूचा हा व्हिडीओ योग्य असून तो चुकीच्या मार्गाने प्रेक्षकांसमोर दाखवण्यात आला असल्याचं मत रिंकूने स्पष्ट केलं आहे.
रिंकूने या प्रकरणावरुन इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने म्हटलं आहे की, “जळगावमधील कार्यक्रमावर माझं मत. नुकतंच मी एका कार्यक्रमासाठी जळगावला गेले होते. तिथे गर्दीमध्ये मी चाहत्यांवर ओरडले अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमात पसरवल्या जात आहेत. कार्यक्रमा ठिकाणी अशी कोणतीच घटना घडली नसून माझा हात खेचल्यामुळे एका representative बरोबर मी नम्रपणे बोलले आहे. माझा माझ्या प्रेक्षकांवर पूर्ण विश्वास व प्रेम आहे. त्यांचा मी नेहमीच आदर करते. त्यामुळे अशा बातम्या पसरवू नये, ही विनंती. तुमची रिंकू”, असं म्हणत अभिनेत्रीने अफवा पसरवल्या असं म्हणत स्वतःच मत मांडलं आहे.