मंगळवार, ऑगस्ट 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : बीचवर धमाल डान्स, नंतर गाडीतच डुलक्या अन्…; ऑस्ट्रेलियामध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमचा धिंगाणा, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

सौरभ जाधवby सौरभ जाधव
मार्च 5, 2024 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
maharashtrachi hasyajatra australia tour

maharashtrachi hasyajatra australia tour

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मागील बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. भन्नाट विनोद निर्मिती, प्रत्येक कलाकाराची विशिष्ठ विनोदशैली प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात कारणीभूत ठरली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आता केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित न राहता जगभरात देखील लोकप्रिय ठरत आहे. या कार्यक्रमाचे महाराष्ट्रासह परदेशातही दौरे होत असतात. हास्यजत्रेची टीम सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. परदेशात प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर तिथेही सर्व कलाकार मंडळी धमाल करताना दिसतायत. प्राजक्ता माळी, समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात यांच्यासह हास्यजत्रेचे दिग्दर्शक सचिन मोटेसुद्धा या ट्रेंडिंग गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.(Maharashtrachi Hasyajatra Australia Tour)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने हे रिल शेअर करत “When In Australia and bunch of mad people comes together.” असं कॅप्शन देखील लिहिलं आहे. पुढे प्राजक्ता म्हणते “सचिन मोटे सर सुद्धा सामील झाले, याचा विशेष वाला आनंद..”. प्राजक्ताने शेअर केलेल्या या रिलवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स करत कलाकारांचं कौतुक केलं आहे. या रिलवर चाहत्यांसह अन्य कलाकारांनी देखील कमेंट्स केलेल्या पाहायला मिळतायत. हास्यजत्राफेम श्याम राजपूत ने “वाह मोटे सर” अशी कमेंट करत सचिन मोटे यांच्या डान्सचं कौतुक केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

आणखी वाचा- लग्नानंतरच्या बायकोच्या पहिल्या वाढदिवसाला प्रथमेश परबने दिलं सरप्राइज, जंगी सेलिब्रेशन केलं अन्…; म्हणाला, “तुझं हसणं, रडणं, रुसणं…”

या रिलनंतर प्राजक्ताने(prajakta mali) आणखी एक भन्नाट स्टोरी शेअर केली आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये चेतना भट, नम्रता संभेराव, वनिता खरात आराम करताना दिसत असून प्राजक्ताने या व्हिडीओला “रिल्स करून दमलेल्या MHJ गर्ल्स” असं मजेशीर कॅप्शन दिलं आहे . हास्यजत्रेतील कलाकार मंचावर अनेक भन्नाट स्किट्स सादर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतातच पण त्याचबरोबर सोशल मीडियावर अनेक रिल्स शेअर करत देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनात भर पाडत असतात. (Maharashtrachi Hasyajatra Australia Tour)

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा- ठाण्यामध्ये स्वतःचा दवाखाना सुरु केला; पण दत्तू मोरेच्या पत्नीने कोणत्या विषयामध्ये मिळवली डॉक्टरची पदवी?, कुटुंबात आनंदाचं वातावरण

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील समीर चौघुले, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, गौरव मोरे यांच्यासह अन्य कलाकारांच्या धमाल विनोद निर्मितीमुळे महाराष्ट्रभर हास्यजत्रेचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामी व सचिन मोटे यांच्या दिग्दर्शनामुळे हास्यजत्रा आहे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. सध्या हसयाजत्रेचा हा ऑस्ट्रेलिया दौरा चांगलाच गाजतोय. प्राजक्तासह अभिनेता प्रसाद खांडेकरने देखील या दौऱ्यातील अनेक फोटोज शेअर केले आहेत.

Tags: हास्यजत्राentertainmentmaharashtrachi hasy jatramaharashtrachi hasyajatra australia tourmarathi serialprajakta mali mhj
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

paach futacha bachchan
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ कोण?, रंगभूमी गाजवल्यानंतर श्रुती मधुदीपची सिनेमात दमदार एन्ट्री

ऑगस्ट 24, 2026 | 4:48 pm
 Tejaswini Lonari & Samadhan Sarvankar Baby Boy
Entertainment

सुप्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, केलं चिमुकल्या बाळाचे स्वागत, कौतुकाचा वर्षाव

ऑगस्ट 22, 2026 | 4:21 pm
Lagnantar Hoyilch Prem Promo
Entertainment

‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत मोठा ट्विस्ट! कॉलेजमध्येच नंदिनीने केली काव्याची डिलिव्हरी, प्रोमो पाहून प्रेक्षक थक्क

ऑगस्ट 20, 2026 | 5:54 pm
Monsoon Kitchen Tips
Lifestyle

पावसाळ्यात मीठ वारंवार ओलसर होतंय? ‘या’ किचन टिप्स वापरून व्हा समस्येपासून मुक्त

ऑगस्ट 19, 2026 | 11:19 am
Next Post
PM Narendra Modi on Actress vaijayanthi Mala

‘पद्म विभूषण’ पुरस्कार विजेत्या वैजयंती माला यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली भेट, म्हणाले, “संपूर्ण देशभरात त्यांना…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.