स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु असलेली ‘रंग माझा वेगळा’ मालिका गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. सौंदर्याची परिभाषा सांगणाऱ्या दीपा आणि कार्तिकची ही लव्हस्टोरी सर्वांनाच आवडली असून मोठ्या गॅपनंतर मालिकेत झालेला बदलही प्रेक्षकांना तितकाच भावतोय. त्यामुळे मालिकेने टीआरपीमध्ये आपले स्थान टिकवून ठेवलंय. काही महिन्यांपूर्वीच मालिकेने १००० एपिसोडसचा टप्पा गाठला असून इतकी चढ-उतार होत असूनही मालिकेची घोडदौड सुरूच आहे.(Reshma Shinde Fan Moment)
आता मालिका एका रंजक वळणावर आली असून दीपा व कार्तिकमधील गैरसमज दूर होतायत. त्याचबरोबर साक्षीच्या खुनाचा उलगडा समोर येत असून ह्यात कार्तिक निर्दोष असल्याचा आपल्याला येत्या एपिसोडसमध्ये कळणार आहे. दीपावर चाहते ऑनस्क्रीन जितके प्रेम करतात, तितकेच प्रेम ते ऑफस्क्रीनही करतात. अन त्याची ही प्रचिती नुकतीच दीपाला म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदेला आली.

कोल्हापूरातील एका कार्यक्रमात ‘रंग माझा वेगळा’ व स्टार प्रवाहामधील अन्य कलाकार आले होते. यावेळी उपस्थित महिला चाहत्यांनी रेश्माला उचलण्याचा प्रयत्न केला. यावर ऑनस्क्रीन आई हर्षदा खानविलकरने लगेच रेश्माचा हात पकडत तिला मागे खेचले. रेश्माने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लिहिलंय, “प्रेक्षकांनी उचलून धराव ही प्रत्येक कलाकाराची अपेक्षा असते… पण अशाप्रकारे नक्कीच नाही ????❤️???? #पुरेपूर_कोल्हापूर #grateful #blessed”
आणि चाहत्यांच्या कृत्यावर कलाकार ही हसून लोटपोट(Reshma Shinde Fan Moment)
रेश्माच्या या व्हिडिओवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी मजेशीर कमेंट्स केल्यात. त्यात अभिनेत्री शर्मिला राजारामने “Mumma ne bachaya @harshadakhanvilkar ????” अशी कमेंट केली. त्यावर रिप्लाय देताना रेश्मा म्हणाली, “@sharmilarajaramshindeactor haa yarr.. @harshadakhanvilkar she is love❤️”. तर एका चाहत्याने “tumhi ahech tasha kutla pn pasnt krnara preshk tumchi acting ani tumch jo real nature ahe tyasthi tumhla ha man milanr ase ahe tse rha ❤️” अशी सुंदर कमेंट केली.
रेश्मा आणि हर्षदा यांची ऑनस्क्रीन बॉण्डिंग जितकी सुंदर आहे, तितकीच ती ऑफस्क्रीनसुद्धा आहे. केवळ हर्षदाच नाही, तर मालिकेतील सहकलाकारांसोबत रेश्माचं उत्तम बॉण्डिंग आहे. सेटवर प्रत्यक्ष शूटदरम्यान वातावरण गंभीर असलं, तरी शूटनंतर मात्र कलाकारांची मजामस्ती ही सुरूच असते.(Reshma Shinde Fan Moment)