गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युजवेंद्र चहल व रीलस्टार, कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. मात्र दोघांनीही या विषयी कोणतेही भाष्य केले नाही. अशातच धनश्रीने सोशल मीडिया वर स्टोरी पोस्ट करत मौन सोडले होते. तसेच यामध्ये कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसल्याचेही तिने यामध्ये म्हंटले आहे. मात्र घटस्फोटाचे वृत्त समोर आल्यापासून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अशातच आता धनश्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. तसेच हे नातं संपण्याला धनश्री जबाबदार असल्याचेही अनेकांनी म्हंटले आहे. (dhanshree verma troll)
युजवेंद्र व धनश्री वेगळे झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. अनेकांनी धनश्रीच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टदेखील केल्या होत्या. तिचे अनेक व्हिडीओदेखील पोस्ट केले होते. अनेकांनी वेगळं होणं हा युजवेंद्रसाठी चांगला निर्णय ठरु शकतो असे म्हंटले आहे. एका नेटकऱ्याने म्हंटले आहे की, “अनुष्का शर्माकडून काहीतरी प्रेरणा घे. तिचं लग्न तर विराट कोहलीबरोबर झालं आहे”. तसेच दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “लग्न खूप भयंकर असते”. तसेच एका नेटकऱ्याने फोटो शेअर करत लिहिले की, “धनश्री व नताशा यांनी साक्षी व अनुष्का बनण्याचा प्रयत्न करावा”.
Popular opinion Never marry girls who dance on reels, either you'll become a chhapri or end up divorced #yuzvendrachahal #dhanashreeverma pic.twitter.com/lXwXOzfJQv
— Rocky. (@KohliInspirer) January 4, 2025
त्यानंतर एका नेटकऱ्याने लिहिले की, “मेहनत नाही, फुकटात मिळालेली संपत्ती आहे”. मात्र काही जण धनश्रीला पाठिंबा देतानाही दिसत आहेत. तिला पाठिंबा देत एका नेटकऱ्याने लिहिले की, “युजवेंद्रसाठी एकनिष्ठ होती”. दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “तुमच्याबद्दल खूप नकारात्मक काही पसरवलं जाईल. पण तुमच्या पाठिंब्यामध्ये खूप काही असेल”.
या जोडप्याने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलोही केले आहे, त्यानंतर या अफवांना वेग आला आहे. घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सोशल मीडियावर लोक धनश्रीवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरचा आरोप करत होते. तिचे नाव कोरिओग्राफर प्रतीक उतेकरबरोबर जोडले जात होते. अशा परिस्थितीत आता धनश्रीने घटस्फोटाच्या बातमीत तथ्य आहे की नाही याबाबत काहीही सांगितले नसले तरी सर्वांनाच उत्तर दिले आहे.