Hina Khan Breast Cancer : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या कठीण काळातून जात आहे. अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला तोंड देत आहे. अभिनेत्री ओढवलेल्या या परिस्थितीला अत्यंत धैर्याने आणि सकारात्मकतेने सामोरे जात आहे. अलीकडेच ती ‘इंडियाज बेस्ट डान्सर vs सुपर डान्सर’ या शोमध्ये दिसणार आहे. या शोचे अनेक प्रोमो समोर आले आहेत. हिनाने सांगितले की, या शोमध्ये येण्यापूर्वी ती तिच्या रेडिएशन सेशनसाठी आली होती. याशिवाय हिनाने सांगितले की, जेव्हा तिला या आजाराबाबत कळले तेव्हा तिने ही परिस्थिती कशी हाताळली. या शोचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये गीता माँ हिनाला विचारते की, “तुझी कथा खूप प्रेरणा देते. पण असा काही क्षण असावा जिथे तुला असे वाटले असेल की मला माझा आजार अशा प्रकारे बरा करावा लागेल”. तर याचं उत्तर देत हिना म्हणाली, “ज्या रात्री मला या आजाराबाबत कळले, तेव्हा माझा पार्टनर घरी आला. माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की ही एक गंभीर समस्या आहे. अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे ऐकून मलायका अरोरा माझी मैत्रीणही बिथरली. तिच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट दिसत होते”.
आणखी वाचा – “कुमार सानू मला पतीसारखे होते”, गायकाच्या एक्स गर्लफ्रेंडचा मोठा खुलासा, म्हणाली, “एकमेकांच्या जवळ आलो आणि…”
हिना पुढे म्हणाली, “१० मिनिटांनंतर मी वर पाहिले आणि मला आठवले की १० मिनिटांपूर्वी मी माझ्या भावाला सांगितले होते की, मला माहित नाही, आज मला फालूदा खावासा वाटत आहे. तर कुठेतरी माझ्या डोक्यात क्लिक झाले की घरात काहीतरी गोड आले आहे, ते माझ्यासाठी चांगले असावे. अर्थात सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घ्या. म्हणून मी त्याला गोड आणायला सांगितले. सर्व काही चांगले होईल”.
त्यानंतर हर्ष म्हणतो की, हिनाने या शोमध्ये एक गाणे गायले होते, ‘लग जा गले’, ते तू इथे गाणार आहेस का. तर हिना म्हणाली, “हो मला गाऊ दे”. यानंतर हिनाने एक गाणे गायले. हिनाच्या या सुंदर परफॉर्मन्सनंतर सर्वांनी उभे राहून हिनासाठी टाळ्या वाजवल्या.