गुरूवार, सप्टेंबर 10, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमच्या घरातच बसून दारु प्यायली आणि…”, ‘त्या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं होतं रवींद्र महाजनींबरोबर लग्न, पत्नीचं भाष्य, म्हणाल्या, “त्याच्या रुममध्ये राहायची…”

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 17, 2024 | 6:41 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ravindra Mahajani Incident

"आमच्या घरातच बसून दारु प्यायली आणि…", 'त्या' सुप्रसिद्ध अभिनेत्रीला करायचं होतं रवींद्र महाजनींबरोबर लग्न, पत्नीचं भाष्य, म्हणाल्या, "त्याच्या रुममध्ये राहायची…"

सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांनी एक काळ विशेष गाजवला. बऱ्याच हिट चित्रपटांमधून रवींद्र यांनी त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांवर छाप पाडली. रवींद्र यांच्या अचानक आलेल्या मृत्यूच्या बातमीने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. अनेकांनी रवींद्र यांच्या मृत्यूच्या बातमीने हळहळ व्यक्त केली. रवींद्र हे सिनेसृष्टीतील देखण्या अभिनेत्यांपैकी एक होते. रवींद्र यांच्या सौंदर्यावर अनेक चाहते घायाळ होते. अशा या देखण्या कलाकाराबाबतचा एक किस्सा रवींद्र यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी सांगितला आहे. (Ravindra Mahajani Incident)

रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्यांच्या चौथा अंक या पुस्तकात त्यांच्या आयुष्याबाबतचे अनेक किस्से सांगितले आहेत. यांत त्यांनी रवींद्र यांच्यावर एका अभिनेत्रीचं प्रेम होतं तो किस्सा सांगत म्हटलं आहे की, “मी वानखेडे स्टेडियमला नोकरी करीत होते त्यामुळे मी घरी नसायचे. तेव्हा रवीबरोबर एका चित्रपटात काम केलेली अभिनेत्री त्याच्यावर फिदा होती. ती माझ्या घरी फोन करायची. घरातला नोकर फोन घेत असे. त्याच्याकडून रवी कोणत्या शहरात शूटिंग करत आहे, याची ती माहिती घ्यायची. त्याप्रमाणे ती त्याच्या हॉटेलमधे जायची. हे रवीला कळले की, तो मलाच फोन करायचा, “हिला कुणी सांगितले मी इथे आहे म्हणून?”, मग म्हणायचा, “आता मी काय करु? ती माझ्या रूममधे जाऊन बसली असणार.” कधी तो तिला टाळण्यात यशस्वी व्हायचा. कधी रुममधे गेल्यावर कळायचे. ती मग तिथे त्याच्याबरोबरच राहायची.”

आणखी वाचा – Video : या वयातही अमृता सुभाषच्या आईचा उत्साह पाहून चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव, गाडीमध्ये गाणं गाऊ लागल्या अन्…; व्हिडीओ व्हायरल

यापुढे त्यांनी सांगितलं आहे की, “एकदा मी ऑफिसला गेलेले असताना घरी सासूबाई होत्या. रवी मुंबईतच स्टुडिओमधे गेला होता. ही नटी अचानक घरी आली. तिने आमच्या घरातला बार उघडला आणि हॉलमधे पीत बसली. ती इतकी प्याली की, तिथेच लवंडली. मी ऑफिस सुटल्यावर घरी आले, तर सासूबाईंनी मला ती कशी पसरली आहे ते दाखवले. थोड्या वेळानं रवीही आला.”

आणखी वाचा – मालिकांमध्ये काम करणारा चेहरा हरपला, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चाहतेही हळहळले

पुढे त्या म्हणाल्या, “सासूबाई बाहेर असल्याने आम्ही तिला उठवून आत नेले. ती रवीला म्हणाली, “मला तुझ्याशी लग्न करायचं आहे.” मला म्हणाली, “आपण दोघीही याच्याबरोबर एकत्र राहू.” शेवटी कसेबसे तिला आम्ही धरुन गाडीत घातले. ह.रा. महाजनी मार्गावरच गाडी असताना गाडी थोडी स्लो झाली आणि तिने गाडीतून बाहेर उडी मारली आणि गाडीसमोर जाऊन झोपली. तिला रवीला सोडून जायचे नव्हते. मग पुन्हा आम्ही दोघांनी तिला उचलून कसंबसं गाडीत कोंबलं आणि माहिमला तिच्या आईकडे सोडलं. त्यानंतर मात्र ती कधी पुन्हा घरी आली नाही.”

Tags: entertainmentmarathi actorravindra mahajaniRavindra Mahajani Incidentravindra mahajani wife
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Shweta Bachchan on abhishek bachchan

...अन् रागामध्ये अभिषेक बच्चनने बहिणीचे कापले होते केस, श्वेता बच्चनेच सांगितला 'तो' प्रसंग, म्हणाली, "आई-बाबा बाहेर गेल्यानंतर..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.