बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Daryabhavani Marathi Movie

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार 'या' दिवशी प्रदर्शित

Daryabhavani Marathi Movie : लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुप्रतिक्षित ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त एका अनोख्या आणि भावनिक क्षणाने पार पडला. शुभारंभाच्या प्रसंगी दिग्पाल लांजेकर यांनी पारंपरिक पद्धतीने गाऱ्हाणं घालत चित्रपटाच्या यशासोबतच ‘दर्याभवानी’शी जोडलेल्या प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि टीम सदस्याच्या सुख-समाधानासाठी मनापासून प्रार्थना केली. या गाऱ्हाण्यात चित्रपटाच्या निर्मितीसाठी पडद्यामागे आणि पडद्यावर मेहनत घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानण्यात आले. संपूर्ण टीमच्या कल्याणासाठी केलेल्या या प्रार्थनेमुळे ‘दर्याभवानी’ चित्रपटाचा मुहूर्त केवळ चित्रपटाच्या शुभारंभाचा सोहळा न राहता, एकजूट, कृतज्ञता आणि आपुलकीचा सुंदर क्षण ठरला.

‘दर्याभवानी’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी सागरी धोरणाला आणि मराठी आरमाराच्या अद्वितीय पराक्रमाला मोठ्या पडद्यावर साकार करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या भव्य ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करताना दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच या शुभारंभाच्या केंद्रस्थानी ठेवत केलेली प्रार्थना विशेष लक्षवेधी ठरली. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे आणि एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार, सुरज सादमवार यांनी केली असून, पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत.

आणखी वाचा – सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

मुहूर्ताच्या प्रसंगी कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञ मोठ्या उत्साहात उपस्थित होते. पारंपरिक गाऱ्हाणं, कृतज्ञतेची भावना आणि सर्वांच्या भल्याची प्रार्थना अशा सकारात्मक वातावरणात ‘दर्याभवानी’च्या चित्रीकरणाच्या नव्या पर्वाला शुभारंभ झाला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सातवा चित्रपट म्हणून ‘दर्याभवानी’कडे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. आता या अनोख्या आणि भावनिक मुहूर्ताने चित्रपटाच्या भव्य प्रवासाची सुरुवातही तितकीच खास आणि संस्मरणीय ठरली आहे.

Tags: entertainmentmarathi actormarathi movie
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Dashami Movie Song

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.