मराठी सिनेसृष्टीतले हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचं अकाली निधन झालं आहे. रवींद्र महाजनी यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. १४ जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथील घरात ते मृतावस्थेत आढळले. गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत ते भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या घरातून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने रहिवाशांनी याबद्दलची माहिती पोलिसांत दिली.(Ravindra Mahajani Death)
याबाबत जेव्हा पोलिसांनी दखल घेतली तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. एवढ्या मोठ्या अभिनेत्याची ही गंभीर अवस्था पाहून चाहत्यांनी आता प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी राहत्या घरी पोहोचला आहे. गश्मीर आणि रवींद्र महाजनी यांनी एकत्र पानिपत या चित्रपटात काम केलं होत. एकत्र काम करूनही त्यांच्यात असे कोणते वाद होते ज्यामुळे ते एकत्र राहत नव्हते असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला आहे.
पाहा रवींद्र महाजनी यांच्या एकट्या राहण्यावर काय म्हणाले चाहते (Ravindra Mahajani Death)

पोलिसांच्या अनुमाने त्यांचा दोन दिवसापूर्वीच मृत्यू झाला होता, यावरून त्यांच्याशी या दोन दिवसांत कुटुंबातील कोणीच संपर्क साधला नाही का असाही प्रश्न चाहत्यांनी विचारला आहे.(Ravindra Mahajani)
हे देखील वाचा – ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी काळाच्या पडद्याआड, दोन-तीन दिवसांपूर्वीच झाला दुर्दैवी मृत्यू!
मुंबईचा फौजदार, देवता, जिवा सखा, पानिपत अशा अनेक दर्जेदार मराठी व हिंदी सिनेमांमधून रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी १९७५ ते १९९० हा काळ चांगलाच गाजवला.
