रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, अयोध्या उभारणार, सेटसाठी तब्बल इतका खर्च

Saurabh Moreby Saurabh More
एप्रिल 4, 2024 | 6:26 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranbir Kapoor's Ramayana shoot started, the sets have been built in Mumbai see the details

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, अयोध्या उभारणार, सेटसाठी तब्बल इतका खर्च

‘अ‍ॅनिमल’ या लोकप्रिय चित्रपटानंतर अभिनेता त्याचया आगामी रामायण या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. गेले काही दिवस या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. अशातच या चित्रपटाविषयी एक नवीन अपडेट समोर येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.

या चित्रपटाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आलेली असतानाही या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे.  या व्हिडीओमध्ये पुरातन काळाचं प्रदर्शन करण्यासाठी वास्तुचं बांधकाम केलं जात असल्याचं पहायला मिळत आहे. त्यावरुन हा व्हिडीओ ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहे. Asiant News च्या वृत्तांनुसार, मुंबईमध्ये या चित्रपटाचा सेट उभारला जात असून या सेटची अयोध्याचा सेट बांधण्यात आला आहे.

Ramayana set 😻💥#RanbirKapoor #niteshtiwari pic.twitter.com/SuUzwwjyUX

— Ranbir Kapoor 👑❤️ (@Khushali_rk) April 3, 2024

आणखी वाचा – “राजकीय पुढारी रीलस्टार्सचे पुरस्कार सोहळे ठेवतात अन्…”, योगेश शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे?, म्हणाले, “त्यांचे फॉलोअर्स…”

काही मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटासाठी अयोध्येचा भव्य सेट तयार करण्यात आला आहे आणि या सेटची किंमत जवळपास ११ कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच मंगळवारी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मुंबईत रामायणाच्या शूटिंगसाठी तयार केलेला अयोध्या सेट खूपच खास आहे. यामध्ये निर्मात्यांनी अयोध्यासह वनवासाचे जंगल आणि गुरुकुलदेखील बनवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.    

आणखी वाचा – Video : ‘तू दूर का…’, ओंकार भोजनेची कविता ऐकून उपस्थित कलाकार मंडळीही भारावली, जोरदार प्रतिसाद अन्…; व्हिडीओ व्हायरल

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र, आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळत आहे. तसेच या चित्रपटातील इतर भूमिकादेखील समोर आल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस रणबीर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर साई पल्लवी ही जुलै महिन्यात शूटिंगला सुरुवात करणार आहे. दरम्यान, नितेश तिवारी यांचा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.   

Tags: Bollywood entertainment newsentertainment newsranbir kapoor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
juhi parmar on family

९ वर्षांचा संसार मोडला, एकटीने मुलीची जबाबदारी उचलली अन्…; जुही परमारच्या वैवाहिक आयुष्यात वादळ, म्हणालेली, “कोणाचीही इच्छा…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.