‘कुमकुम’ या मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली जुही परमार ही संध्या ‘ये मेरी फॅमिली’च्या तिसऱ्या सीजनमुळे अधिक चर्चेत आली आहे. या निमित्ताने तिने आपले कुटुंब, करियर, सिंगल मदर ही आव्हाने कशाप्रकारे पार पाडली याबद्दल मनसोक्त चर्चा केली आहे. तसेच घटस्फोट घेण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता असेही तिने सांगितले आहेत. याबरोबरच तिने महिलांसामोर असणारी आव्हाने व महिलांबद्दल जी मतं मांडण्यात येतात तसेच याव्यतिरक्त अनेक मुद्दयांवर चर्चा केली आहे. आपल्या खासगी आयुष्यावर तिने नक्की काय भाष्य केले आहे ते आता जाणून घेऊया. (juhi parmar on family)
कुटुंबाबद्दल जुही नेहमी प्रेमाने बोलताना दिसते. तिने २००९ साली सचिन श्रॉफबरोबर लग्न केले. त्यांना एक मुलगीदेखील झाली. पण वैवाहिक आयुष्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याने दोघेही २०१८ साली एकमेकांपासून विभक्त झाले. त्यानंतर तिने एकटीने आपल्या मुलीचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये तिला तिच्या आई-वडिलांची साथ मिळाल्याचेदेखील ती म्हणते. याबरोबरच सिंगल मदर असण्यावरुन म्हणाली की, “आम्ही विभक्त होणे हा आमचा निर्णय होता. मात्र एकट्या व्यक्तीने मुलाचा सांभाळ करणे हे कोणासाठीही सोपं नसतं. तसेच तशी कोणाची इच्छादेखील नसते. मात्र माझ्या घरच्यांनी मला खूप साथ दिली. मला पाठिंबा दिला त्यामुळे मी हे करु शकले”.
पुढे ती म्हणाली की, “सिंगल मदर बनण्याची माझी तयारी नव्हती. पण अशा काही परिस्थिती निर्माण होतात ज्यामुळे हे करणे भाग पडते.तसेच जेव्हा कुटुंबाचा पाठिंबा मिळतो तेव्हा मात्र हा प्रवास अधिक सुखकर होतो. त्यामुळे मी जो प्रवास केला आहे त्यावर मला गर्व आहे”.
तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर सध्या ती ‘ये मेरी फॅमिली’ च्या तिसऱ्या सीजनमध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसणार आहे. याआधी ती ‘कुमकुम’, ‘ये चंदा कानून है’, ‘हमरीवाली गुडन्यूज’ या मालिकांमध्ये दिसली होती. तसेच ‘बिग बॉस’ या शोमध्येही दिसून आली होती.