‘अॅनिमल’ या लोकप्रिय चित्रपटानंतर अभिनेता त्याचया आगामी रामायण या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात रणबीर प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. गेले काही दिवस या चित्रपटाची सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये चर्चा रंगली आहे. अशातच या चित्रपटाविषयी एक नवीन अपडेट समोर येत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
या चित्रपटाबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आलेली असतानाही या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओमध्ये पुरातन काळाचं प्रदर्शन करण्यासाठी वास्तुचं बांधकाम केलं जात असल्याचं पहायला मिळत आहे. त्यावरुन हा व्हिडीओ ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे म्हटले जात आहे. Asiant News च्या वृत्तांनुसार, मुंबईमध्ये या चित्रपटाचा सेट उभारला जात असून या सेटची अयोध्याचा सेट बांधण्यात आला आहे.
Ramayana set 😻💥#RanbirKapoor #niteshtiwari pic.twitter.com/SuUzwwjyUX
— Ranbir Kapoor 👑❤️ (@Khushali_rk) April 3, 2024
काही मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटासाठी अयोध्येचा भव्य सेट तयार करण्यात आला आहे आणि या सेटची किंमत जवळपास ११ कोटी रुपयांच्या आसपास आहे. तसेच मंगळवारी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. मुंबईत रामायणाच्या शूटिंगसाठी तयार केलेला अयोध्या सेट खूपच खास आहे. यामध्ये निर्मात्यांनी अयोध्यासह वनवासाचे जंगल आणि गुरुकुलदेखील बनवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र, आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळत आहे. तसेच या चित्रपटातील इतर भूमिकादेखील समोर आल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या एप्रिल महिन्याच्या अखेरीस रणबीर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर साई पल्लवी ही जुलै महिन्यात शूटिंगला सुरुवात करणार आहे. दरम्यान, नितेश तिवारी यांचा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल.