मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रणबीर कपूरचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, राहाबरोबर मैदानात खेळतानाचे फोटो समोर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 15, 2025 | 11:14 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Ranbir Kapoor With Raha

रणबीर कपूरचं लेकीबरोबर आहे खास बॉण्डिंग, राहाबरोबर मैदानात खेळतानाचे फोटो समोर

Ranbir Kapoor With Raha : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर पापाराझींच्या आवडत्या स्टार किड्सपैकी एक आहे. सर्वसामान्यांनाही राहा खूप आवडते. आलिया पाठोपाठ राहा आता चाहत्यांच्या आवडती झाली आहे. तिचा गोंडस चेहरा आणि वर तिची निष्पाप कृती प्रत्येक वेळी लोकांची मनं चोरताना दिसतात. यावेळीही असेच काहीसे घडले आहे. यावेळी स्वतः रणबीर आपली मुलगी राहाबरोबर खेळाच्या मैदानात वेळ घालवताना दिसला. वास्तविक, ही छायाचित्रे काही खेळाच्या मैदानातील आहेत. जिथे रणबीर आणि आलियाची मुलगी राहा खेळाच्या मूडमध्ये दिसत आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये राहाच्या पायात चप्पल नाही आणि ती इकडे तिकडे गवतावर धावताना दिसत आहे. तर तिच्या जवळच बसलेले तिचे वडील रणबीर याची नजर लेकीवर खिळलेली आहे. आणि खेळता खेळता राहा पप्पाकडे धावत येताना दिसतेय. यानंतर दोघांमध्ये काहीशी मस्ती होताना दिसते. त्याचवेळी राहाही आनंदाने हसताना दिसत आहे. एका फोटोमध्ये रणबीर त्याच्या मांडीवर बसून तिला मिठी मारताना दिसत आहे.

आणखी वाचा – अनुष्काचा खरा चेहरा आला समोर, पारू अहिल्यादेवींसमोर सत्याचा उलगडा करणार का?, मोठा ट्विस्ट

यातील काही छायाचित्रांमध्ये रणबीर कपूरने कपाळावर फुलांचा हेअरबँडही घातला आहे. या हेअरबँडमध्ये पापाला पाहून राहाला हसू आवरत नाही असे दिसतेय. त्याच्या एका मुलाखतीत रणबीरने राहाबरोबरचा त्याच्या आवडत्या क्षणाचा खुलासा केला होता. यावेळी रणबीर म्हणाला होता, “राहाला डोळा मारणे, तिने मला लगेच ओळखणे, मला मिठी मारणे, माझे चुंबन घेतले. माझ्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही क्षण विशेष असेल असे मला वाटत नाही”.

आणखी वाचा – वयाच्या ७४व्या वर्षी रजनीकांत यांची जबरदस्त ॲक्शन, डायलॉग अन्…; ‘जेलर २’च्या टिझरची सर्वत्र हवा, उत्सुकता वाढली

त्याच मुलाखतीत ते म्हणाले होते, “रविवारी मी माझी मुलगी राहाबरोबर खूप वेळ घालवतो आणि घरी बनवलेले जेवण खातो. मी फुटबॉल, गोल्फ किंवा पॅडल टेनिस खेळतो”. रणबीर व आलिया नेहमीच तिच्या मुलींबरोबर स्पॉट होताना दिसतात. रणबीर व आलिया यांचे बांद्रा येथील लेकीसाठी बांधलेले आलिशान घरही आता तयार झाले आहे. लवकरच ते या नव्या घरात लेकीसह राहायला जाणार आहेत.

Tags: bollywood newsranbir kapoor and allia bhattRanbir Kapoor With Raha
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Kranti Redkar Wedding Anniversary

क्रांती रेडकर व समीर वानखेडेंच्या लग्नाला आठ वर्ष पूर्ण, नवऱ्यासाठी शेअर केली सुखद पोस्ट, म्हणाली, "सर्व चढ-उतारांसह…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.