Jailer 2 Announcement Teaser : साऊथ चित्रपटसृष्टी नेहमीच काही ना काही विषय घेऊन नवनवीन चित्रपट घेऊन येत असते. साऊथ चित्रपटांचा रेकॉर्ड अद्याप कोणीही ब्रेक करु शकलेलं नाही. तर साऊथ सुपरस्टार रजनीकांतने आजवर अनेक चित्रपट केले आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्यांचा जगभरात खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवरही नेहमीच कल्ला करताना दिसतात. साऊथचे सुपरस्टार रजनीकांत पुन्हा एकदा वयाच्या ७४ व्या वर्षी जबरदस्त ॲक्शन करताना दिसणार आहेत. त्यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाचा सीक्वल येणार असून मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी याबाबतची घोषणा केली आणि टीझर प्रोमोही प्रदर्शित केला.
चित्रपटाचा टिझर पाहून आता चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. ‘जेलर २’चे दिग्दर्शक नेल्सन आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध नव्या स्क्रिप्टवर चर्चा करत आहेत. मग त्यांच्या आजूबाजूला गोळीबार आणि तोडफोड सुरु होते. यानंतर रजनीकांतचा प्रवेश. रजनीकांत यांच्या डोळ्यात राग आहे आणि त्यांच्या हातात बंदूक आणि तलवार आहे. यानंतर ते कोपऱ्यात लपून बसलेल्या नेल्सन आणि अनिरुद्धला गुंडांबद्दल विचारत आहेत आणि मग त्यांना मारायला जाताना दिसत आहेत. तब्बल चार मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा – अनुष्काचा खरा चेहरा आला समोर, पारू अहिल्यादेवींसमोर सत्याचा उलगडा करणार का?, मोठा ट्विस्ट
‘जेलर’ हा चित्रपट २०२३ साली प्रदर्शित झाला होता. रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील हा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता. आता त्याच्या सिक्वेलचीही प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. कलानिथी मारन यांच्या सन पिक्चर्सच्या पाठिंब्याने, ‘जेलर 2’ च्या कलाकार आणि क्रू बद्दल कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यात विजय कार्तिक कन्ननला परत आणणार का?, शिवराजकुमार, मोहनलाल आणि जॅकी श्रॉफ परततील का? हे येणाऱ्या काही दिवसांत कळेल.
आणखी वाचा – दारू पिऊनच स्वतःच्या लग्नासाठी मंडपात उभे राहिले होते ऋषी व नीतू कपूर, गिफ्टमध्ये दगड मिळालेले अन्…
‘जेलर २’ व्यतिरिक्त रजनीकांत ‘कुली’ चित्रपटात दिसणार आहे. यात नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहीर, श्रुती हासन यांसारखे कलाकार दिसणार आहेत. आमिर खानचेही नाव घेतले जात आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट आहे.